महाराष्ट्रात राजकीय खळबळ! शिंदे गटात राजीनामा, भाजपात गटबाजी, ठाकरे गटात निलंबनाची टांगती तलवार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. शिंदे गटातील तडकाफडकी राजीनामा, भाजपातील उफाळलेली गटबाजी, ठाकरे गटातील नगरसेवकांवरील कारवाईची शक्यता, तसेच टिपू सुलतान वादावरून आरोप-प्रत्यारोप… या सर्व घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा सिंधुदुर्ग येथील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा..

मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा; प्रताप सरनाईक

मुंबई: कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या, तसेच काही […]

अधिक वाचा..

भावाने साथ दिली नाही! निलंबनानंतर दुसऱ्याच दिवशी के. कविता यांचा BRS ला ‘जय तेलंगणा

नवी दिल्ली: भारत राष्ट्र समितीच्या (BRS) निलंबित नेत्या के. कविता यांनी आपले कुटुंब आणि पक्षात सुरू असलेल्या कथित कटांबाबत माध्यमांमध्ये विधान केले आहे. यासोबतच, त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. कविता यांनी केवळ आपला भाऊ के.टी. रामा राव यांच्यावरच निशाणा साधला नाही, तर चुलत भाऊ हरीश राव आणि संतोष राव यांच्यावरही गंभीर आरोप केले. […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचे आदेश! बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन

नागपूर: उपराजधानी नागपूरमध्ये बारमध्ये बसून सरकारी काम सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बिअर बारमध्ये बसून महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल क्लिअर करण्याचे काम सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारले. […]

अधिक वाचा..

भर सभागृहात शिंदेंना तोंडावर गद्दार म्हटले, आदित्य ठाकरेंच्या निलंबनाची मागणी

मुंबई: विधीमंडळात गुरुवारी दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसले. केंद्रस्थानी होते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे. एकनाथ शिंदे यांनी 293 च्या चर्चेला उत्तर दिले. यावरून आपल्याला बोलायचे असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले. मात्र विधानसभा अध्यक्षांनी तुम्हाला तसे करता येणार नाही असं म्हटल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. हा गदारोळ सुरू असतानाच आदित्य ठाकरे सदनात […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये एन.ए. प्लॉट घोटाळा उघड!  प्रांताधिकाऱ्यांचा प्लॉट विक्री व बांधकामाला स्थगिती आदेश

माव्र्हल एम्पायर सोसायटीतील गैरव्यवहारामुळे अनेक नागरिक फसले; शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीत गट नं. ३०९/१ मधील तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीचा एन.ए. प्लॉट विक्री आणि बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश जारी केला आहे. या जमिनीवर सध्या न्यायालयीन दावा सुरु असताना देखील ५० पेक्षा जास्त […]

अधिक वाचा..

पक्षविरोधी भूमिका घेत महायुतीची प्रतिमा मलिन करणार्‍या 8 पदाधिकाऱ्यांवर केली निलंबनाची कारवाई…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षविरोधी भूमिका घेतली शिवाय महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग केल्याने आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला […]

अधिक वाचा..

राहुलजी गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक

मुंबई: काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुलजी यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुलजी गांधींच्या शिक्षेला स्थगिती […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पत्रकाराला शिवीगाळ करणे पडले महागात, अखेर एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन

आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी केली कारवाई शिरूर (तेजस फडके): शिरूर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथे दारूच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली होती. शिरूर पोलीस स्टेशन येथे एसटी चालक शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्यावर कलम […]

अधिक वाचा..

अनेकांना नाहक त्रास दिल्याने त्या पोलिस निरीक्षकाचे निलंबन…

सुप्यातील नागरीकांनी फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा शिरुर (अरुणकुमार मोटे): महिलेस भर रस्त्यावर मारहाण तसेच अधिक नाजुक प्रकरणांमुळे बदनाम झालेल्या नगर – पुणे हायवेवरील सुपा. ता. पारनेर या पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नितिनकुमार निळकंठ गोकावे याचे निलंबन करुन राज्याच्या गृह विभागाने त्याच्या मुजोरीला लगाम लावला आहे. हा सगळा प्रकार टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने […]

अधिक वाचा..