शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांचा उच्छाद, खुणाच्या, चोरीच्या घटना उघडकीस येईना…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत खुणासह, बलात्कार, सोनसाखळी चोऱ्या, मंदीरातील चोऱ्या, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, ठिबक सिंचन संच चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यातील अनेक गुन्हे अदयापपर्यंत उघडकीस आले नसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेला आरोपी अदयापपर्यंत फरार आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातून बुलेटची चोरी; गुन्हे दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह व शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल, महीलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवजाची चोरी, खुण, दरोडा या पाठोपाठ दुचाकी चोऱ्यांचे सत्र वारंवार घडत आहे. नुकतीच शिरूर शहरातील रेव्हुन्यू कॉलनीतील उमेश आनंदा इसवे या युवकाची बुलेट मोटारसायकल अज्ञात इसमांनी चोरून नेली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, उमेश आनंदा इसवे (वय […]

अधिक वाचा..

कासारीतून सेंट्रींग कामाच्या प्लेटा चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील बंगल्याच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणहून सेंट्रींग कामाच्या प्लेटा चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कासारी (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांच्या प्लॉटिंगमध्ये इस्माईल खान यांच्या बंगल्याचे काम सुरु असून सदर काम रामानंद चौहान हे ठेकेदार करत आहेत, सध्या […]

अधिक वाचा..

सोनसाखळी चोऱ्यांनंतर आता शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबलची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातलेला असताना चोरटयांनी आण्णापूर येथील घोडनदी पात्रात असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारींच्या महागड्या केबलची चोरी केली आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला संजय रामदास कुंरदळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 1) फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजल्याच्या सुमारास फिर्यादी संजय कुंरदळे यांनी घोडनदीवरील […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात सोनसाखळी चोऱ्या थांबेना, महीनाभरातील तिसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात गेल्या महीनाभरापासून सोनसाखळी चोरांनी बाबुरावनगर, एसटी स्टॅण्ड, पाबळफाटा परीसरात धुमाकूळ घातला असून महीनाभरातील ही तिसरी घटना असून सोनसाखळी चोरांना गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २९) जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरुर गावचे हद्दीत अहमदनगर – पुणे हायवेच्या सर्विस रोडवर महालक्ष्मी […]

अधिक वाचा..

बैलगाडा घाटातून बुलेट चोरीला, काठापूर येथील दुसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): काठापुर (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यत सुरु असुन अनेक बैलगाडा शौकीन विविध तालुक्यातून ही शर्यत पाहण्यासाठी येत आहेत. हि बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील मल्हारी लबडे यांची शाईन गाडी चोरी गेलेली घटना ताजी असतानाच याच घाटातून पुन्हा जालींदर दत्ताञय दांगट रा. काठापुर यांची (दि 27) रोजी दुपारी 2 ते […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापुरात घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठन फाटा येथील म्यूचल कंपनी समोर राहणारे श्रीनिवास बुरसे हे […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये महिला बँकेत तर चोरट्यांचा घरात डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील एक महिला बँकेत गेलेली असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम अशा तब्बल 1 लाख 63 हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील कविता जाधव हि महिला दुपारच्या सुमारास बँकेत गेलेली होती काही वेळाने घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा […]

अधिक वाचा..
crime

धामारीच्या यात्रेतून महिलेचे दागिने व मोबाईल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील यात्रेमध्ये आलेल्या एका महिलेचा मोबाईल तर एका महिलेच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील यात्रेमध्ये अनिता जाधव व लक्ष्मी पवार हा दोघी बहिणी आलेल्या होत्या, देवदर्शन करुन यात्रेतील गर्दीतून जात […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात चोरांनी गरीबाच्या झोपडीतून कशाची चोरी केली पहा…

शिरुर(अरुणकुमार मोटे): मोठमोठया अलिशान घरांमध्ये चोरी, दरोडा टाकल्याचे आपण नेहमी ऐकले असेल पण चोरांनी चोरी करण्याचा कळस केला असून अज्ञात चोरट्यांनी शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथील कॉलनी फाटयावरील झोपडीतून ऊसतोड कामगारांनी झोपडीत ठेवलेले बाजरीचे दोन कट्टे व उसाचे वाढे विकून जमवलेले 4 हजार रुपये चोरुन नेले आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात या चोरांविषयी तीव्र भावना व्यक्त होत […]

अधिक वाचा..