गुजर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न

इतर

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत विद्यार्थ्यांना योगा दिनाचे महत्त्व सांगत योगासन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत अंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना वैशिष्ट्यपूर्ण बैठक व्यवस्थेत मैदानावर बसवून मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, माजी मुख्याध्यापक प्रभाकर मुसळे, उपशिक्षक नीतीश पवार, राजेंद्र भगत, नंदा सातपुते यांनी योगासनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर करुन दाखवत विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनाच्या मुद्रा करुन घेतल्या. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांनी देखील उपस्थित राहून योगासने करुन विद्यार्थ्यांसमवेत योगासने करण्याचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांना योगासने करण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच आयुष्यातील व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.

यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगासने करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.