शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला असून येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतीमंद विद्यार्थ्यांनी देखील योगाचा आनंद घेतला आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक पवन कट्यारमल, क्रिडा शिक्षक संजय पोटफोडे, मानसशास्त्रज्ञ नृसिंह कुलकर्णी यांनी विविध योगा प्रात्यक्षिके सादर केली.
दरम्यान विद्यार्थ्यांना प्रथम प्रार्थना पुरक हालचाली, मानेचे व्यायाम, दंडस्थितील आसने, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन यांसह अनुलोम विलोम प्राणायम इत्यादी प्रात्याक्षिके करुन घेत, शांतीपाठाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या उपक्रमात सेवाधाम मतीमंद विद्यालयातील सर्व विशेष विद्यार्थ्यांनी सोनाली शिनगारे, वनिता बावनेर, शुभांगी पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात सहभाग घेतला होता.