बाबासाहेबांनी देशातील श्रेष्ठ राज्यघटना लिहिली; जोगेंद्र कवाडे

शिरूर तालुका

पिपल्स पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडेंची विजयस्तंभास भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ राज्यघटना लिहून जगातील प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देत विकासाची संधी उपलब्ध करुन दिली असल्याचे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.

कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे संविधान दिनाच्या निमित्ताने पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व जयदीप कवाडे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना रांत्रदिवस मेहनत करुन बाबासाहेबांनी जगातील अत्यंत श्रेष्ठ अशी राज्य घटना लिहिली असून जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोकशाही वादी देश आहे, त्या सर्व देशांच्या राज्य घटने पैकी जगातील सर्व विद्वानांनी भारताची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्य घटना सर्वात श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे.

73 वर्षे झाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेने देशातील सर्व जातीच्या, धर्माच्या माणसांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला, प्रत्येकाला विकासाची संधी उपलब्ध करुन दिली, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना विकासाची संधी राज्य घटनेतून विकासाची संधी दिली.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेबांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हातात राज्यघटना सोपवली त्यावेळी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना आपल्या मस्तकाला लावली आणि घोषणा केली डॉ. आंबेडकर यांनी संविधान लिहून हे उपकार केले ते उपकार देश विसरू शकत नाही असे सांगितले.

मात्र सध्या देशात राज्यात जातीच्या व धर्माच्या नावाखाली खेळ सुरु आहे ते राज्यघटनेला अभिप्रेत नसल्याचे देखील पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. यावेळी ऐतिहासिक विजयस्तंभाला उपस्थित पदाधिकाऱ्यांसह आदींनी अभिवादन केले. यावेळी देविदास सावते यांनी सर्वांचे आभार मानले.