शिरुर (अरुणकुमार मोटे) एका टेम्पोमध्ये सात म्हशी कृरपणे कोंबुन त्यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची व्यवस्था न करता तसेच जनावरांची वाहतुकीपुर्वी वैदयकीय तपासणी करणे बंधनकारक असताना जनावराची वैदयकीय तपासणी न करता वाहतुकीकरीता घेवुन चालल्याप्रकरणी १) सलीम आजीज पठाण रा. राहु, ता. दौंड, जि. पुणे यांच्या सांगण्यावरुन २) संजय विश्वनाथ कोथंबिरे (वय ४८) ३) सलिम मुस्ताक शेख (वय २६) दोघे रा. जेउर बायजाबाई, ता. जि. अहमदनगर, ४) तालीम कासीम शेख रा. जेउर बायजाबाई, (कुरेशी मोहल्ला) ता. जि. अहमदनगर यांच्या फिर्यादीवरुन पोलिस शिपाई राजाराम शेटीबा गायकवाड यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी कि दि २९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री २:४५ च्या सुमारास न्हावरे गावच्या हद्दीतील चौकात टेम्पो क्रं एम एच ०४ जी सी १५०६ यामधुन वरील चार जणांनी टेम्पोमधुन ७ काळया रंगाच्या म्हशी कृरपणे कोबुंन त्यांना कोणत्याही प्रकारचा चारापाणी व्यवस्था न करता तसेच जनावराची वाहतुकीपुर्वी वैदयकीय तपासणी करणे बंधनकारक असताना जनावराची वैदयकीय तपासणी न करता वाहतुकी करीता घेवुन चालले होते. म्हणुन पोलीस शिपाई राजाराम गायकवाड यांनी वरील ४ इसमांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार जाधव हे करत आहेत.
दुर्दैवी; शिरुर तालुक्यातील निमोणे गावात साप चावल्याने दोन वर्षाच्या मुलीचा उपचारापुर्वी मृत्यू
शिरुर तालुक्यात नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपी बापाला अटक
शिरुर पोलिसांची दहा इलेव्हन कॅफे वर धडक कारवाई, मुला-मुलींचे अश्लील वर्तन; कॅफे चालकावर गुन्हा दाखल