shirur-taluka-logo

पिंपळे जगतापमध्ये ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली

शिरूर तालुका

विशेष विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या वेशभूषेसह प्रभातफेरी

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत विशेष विद्यार्थ्यांनी विविध धर्मियांच्या वेषभूषा गावातून प्रभातफेरी काढून हर घर तिरंगा याबाबत जनजागृती केली.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या विद्यार्थ्यांच्या आयोजित प्रभात फेरीत सरपंच सोनाली नाईकनवरे, पंचायत समितीचे माजी सदस्य भगवान शेळके, विद्यालयाच्या अधिक्षिका भाग्यश्री चिलात्रे, मुख्याध्यापक पवन कट्यारमल, शिक्षिका सोनाली शिनगारे, शुभांगी पायमोडे, वनिता बावनेर यांसह आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

दरम्यान मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी नागरिकांना घरावर तिरंगा फडकवण्या विषयी माहिती दिली. तर विशेष विद्यार्थ्यांनी विविध धर्मियांच्या वेषभूषा साकारत या प्रभातफेरी मध्ये सहभाग घेतला होता, तर विशेष विद्यार्थ्यांनी विविध धर्मियांच्या वेषभूषा साकारत साकारलेल्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व विशेष विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.