ration shop

शिरूर तालुक्यात होतोय रेशनचा मोठा काळाबाजार…

शिरूर तालुका

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात रेशनच्या गहू, तांदूळाचा मोठा घोटाळा होत होत असून त्याची काळया बाजारात खुलेआम मोठया प्रमाणात विक्री होत आहे. शिरुर तहसिल कार्यालयाच्या जवळ असलेल्या गोडावून मधून भरलेल्या अनेक ट्रकमधून रात्रीच्या वेळी गोण्या पलटी करून गहू, तांदळाची मोठया प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करत असल्याची चर्चा होत आहे.

शिरूर तालुक्यातील रेशन दुकानदारांना कार्ड प्रमाणे रेशनचा पुरवठा केला जातो. परंतु रेशनकार्ड ऑनलाईन असणाऱ्यांचे रेशन दिले जाते. मग बाकीचे उरलेले गहू, तांदुळ थेट काळ्या बाजारात विक्री केले जात आहे. यामुळे गरीबांचे धान्य खावून तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार चांगलेच गब्बर झाले आहेत. सतत तीन महीने धान्य न नेल्यास रेशनकार्डधारकांना धान्य दिले जात नाही. काही गावात तर थम घेऊनही रेशन दुकानदार धान्य देत नाही. ऑनलाईनच्या नावाखाली मोठी लुट होत असून गरीबांच्या हक्काचे धान्य त्यांना मिळत नाही. मध्यंतरी कारवाई करण्याच्या नावाखाली शिरूर पुरवठा विभागाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत शिरूर तालुक्यातील लाभधारक या धान्य योजनेतून बाहेर पडले. पण राहिलेल्या बडया लाभधारकांवर अदयाप कुठलीही कारवाई पुरवठा विभागाने केली नाही. त्यामुळे या योजनेतून बाहेर पडलेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ब्लॉक काढण्यासाठी होतोय मोठी आर्थिक लुट…
शिरूर तहसिल कार्यालयात हक्क सोड, वाटप पत्र, खरेदीखत करण्यासाठी वर्ग २च्या जमिनीचे ब्लॉक काढावे लागतात. यासाठी एका आधिकाऱ्याकडून अडवणूक केली जात आहे. अडवणूक करून मोठी आर्थिक लुट करत असल्याची चर्चा तालुका भर होत आहे. कार्यालयातील कर्मचारी वरिष्ठांच्या वागणुकीला, छळाला कटांळले असून त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

शिरुर तहसिलकडून नवीन रेशनकार्डसाठी नागरीक वेठीस; रेशनिंगच्या धान्याचाही होतोय काळाबाजार

पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांकडून आर्थिक लुट

शिरुर तालुक्यात दिव्यांगाना रेशनच धान्य मिळेना, मनमानी कारभार सुरु…

शिरूर पुरवठा विभागात तब्बल दोन हजार रेशनकार्ड तयार…

डिंग्रजवाडीत भिल्ल समाजाला मिळाले चाळीस वर्षांनी रेशन कार्ड