शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या रोड रोमिओ यांच्यावर सलग दोन दिवस कारवाई सुरु आहे. वाहन चालकांवर कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी म्हटले आहे.
शिरूर पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली असून, एकूण ६२ वाहन चालकांवर कारवाई करत तब्बल ७०,००० रु.दंड आकारण्यात आला आहे. यापुढेही अशी धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी अल्पवयीन वाहन चालकांना भरधाव वेगात वाहन चालवल्याने कशाप्रकारे अपघात होतात व त्या अपघाताचे परिणाम आपल्या कुटुंबावर कसे होतात, वाहन चालवताना लायसन्स असणे का गरजेचे आहे. इतर आवश्यक बाबी बाबत मार्गदर्शन करत विना लायसन्स वाहन चालवताना मिळून आल्यास पालकांवर कारवाई केली जाईल, या बाबत समज देण्यात आली आहे.
शिरूर पोलिसांकडून रोडरोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई…
Video मुलाखत: चंदन सोंडेकर: शिरूर-हवेलीचा लोकनेता!
नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!
शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज
पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…