रांजणगाव MIDC च्या मुख्य चौकाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC मध्ये प्रवेश करताना पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या मुख्य चौकाचे “श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे नामकरण करण्यात आले असुन या मुख्य चौकाच्या नामंतराचा गेल्या पाच वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न “श्रीमंतयोगी प्रतिष्ठान” ने मार्गी लावला असल्याचे श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि रांजणगाव गणपतीचे माजी उपसरपंच राहुल पवार यांनी सांगितले.

रांजणगाव गणपती येथे येथे श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे 25 हजार शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसरपंच राहुल पवार यांनी केले होते.

यावेळी “श्रीमंतयोगी प्रतिष्ठान” च्या सर्वच कार्यकर्त्यांनी यावर्षी अवास्तव खर्चाला फाटा देत येथील मुख्य चौकाचे “श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे नामांतरण केले. यावेळी सुमारे 5 ते 6 हजार शिवभक्त मुख्य चौकामध्ये उपस्थित होते. त्यानंतर शिवप्रतीमेचे पुजन, महाआरती आणि त्यानंतर भव्य लेजर शो आणि DJ च्या तालावर शिवभक्तांनी जल्लोष केला. यावेळी आसपासच्या गावातील मान्यवर तसेच रांजणगाव ग्रामस्थ व विविध गावचे युवक उपस्थित होते.

रांजणगाव येथील MIDC चौकाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे अशी शिवभक्तांची बऱ्याच वर्षांपासुनची मागणी होती. मी स्वतः रांजणगाव गणपती चा उपसरपंच असताना याबाबत ग्रामसभेत ठरावही झाला होता. परंतु त्यानंतर मी वारंवार ग्रामपंचायतकडे नामांतराच्या संदर्भात पाठपुरावा केला. परंतु ग्रामपंचायतने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आम्ही “श्रीमंतयोगी प्रतिष्ठान” च्या माध्यमातुन या चौकाचे नामांतरण व सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला.

राहुल पवार

अध्यक्ष; श्रीमंतयोगी प्रतिष्ठान

रांजणगाव गणपती