वडगाव रासाई (तेजस फडके) : शिरूर तालुका एके काळी दुष्काळी तालुका होता. पण, राज्यात आज ८५ टक्के बागायती असलेला हा पहिला तालुका ठरला आहे. शिरूर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. अशोक पवार यांनी विकासकामांच्या माध्यमातून शिरूर हवेलीचा मोठा विकास केला आहे. आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची वडगाव रासाई येथे आज (गुरुवार) जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘एके काळी शिरूर तालुका दुष्काळी होता. दुष्काळासाठी कामं द्या, अशी मागणी केली जात होती. पाणी आल्याशिवाय शिरूर तालुक्याचा विकास होणार नाही, हे लक्षात आले. शिरूर तालुक्यात पाणी आले, एमआयडीसी आल्यामुळे पुर्णपणे चेहरा मोहरा बदलला आहे. रावसाहेब पवार यांनी कामाच्या माध्यमातून एक आदर्श घालून दिला आहे. रावसाहेब पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशोक पवार काम करत आहेत. शिरूर तालुक्यानेही पक्षाला आजपर्यंत मोठी ताकद दिली आहे. यापुढेही अशीच ताकद पक्षाला द्यावी.’
शरद पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान स्वर्गीय माजी आमदार बापूसाहेब थिटे यांच्या सोबत शिरूर ते पुणे प्रवास करताना रांजणगाव जवळ असलेली पडीक जमिनीचा विषय काढला. या जागेवर काही करता येईल, असे बोलले. ती जागा म्हणजे आजची पंचतारांकित एमआयडीसी असल्याचे सांगितले. शिरूर तालुक्याचा अनेक गोष्टींमुळे चेहरा-मोहरा बदलला आहे, असेही शरद पवार म्हणाले.
अशोक पवार म्हणाले, ‘शरद पवार यांच्यामुळे मोठा विकास झाला आहे. शरद पवार यांची शेवट पर्यंत साथ सोडणार नाही. गद्दाराचा शिक्का कपाळावर बसला तर मेल्याशिवाय तो पुसला जात नाही. हृषीराजच्या बाबतीत जी काय घटना घडली ती संपूर्ण तालुक्याला माहित आहे. या विषयावर आत्ता बोलणे उचीत ठरणार नाही. कारखाना सुरू करणे जसे गरजेचे आहे, तसे दिवसा शेतकऱ्यांना विजेची गरज आहे आणि साहेबांसाठी ते अशक्य नाही. पुणे ते शिरूर महामार्गावरील वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सात हजार कोटी मंजूर आहेत. साहेबांमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.’
Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार
अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी घेतली धास्ती…
शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…
निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक : अशोक पवार
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…
काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार
आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…
शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार
Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…
शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?
शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…
घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…
मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर