ashok-pawar-hrishiraj-pawar

शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर: शिरूर-हवेलीचे आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे पुत्र व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार यांच्याबाबत नुकताच घडलेला प्रकार खरा असून, आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, अशी माहती पोलिसांनी दिली.

शिरूर-हवेलीचे आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे पुत्र व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार यांचे 9 नोव्हेंबर रोजी अपहरण करून त्यांची महिलेसोबत अश्लील छायाचित्रे, व्हिडीओ चित्रित केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत 10 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. 2 दिवसांची पोलिस कोठडी वाढविल्याची माहिती शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.

भाऊसाहेब विरा कोळपे (वय 30), मयूर संजय काळे (वय 24) आणि तुषार संजय कुंभार (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. तर संशयित महिला आरोपी पसार झाली आहे. याप्रकरणी ऋषिराज अशोक पवार यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस निरीक्षक केंजळे यांनी सांगितले की, ‘ऋषिराज अशोक पवार यांच्याबाबत घडलेला प्रकार खरा असून आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, तर एक संशयित महिला आरोपी पसार झाली आहे. लवकरच तिला पकडण्यात पोलिसांना यश येईल. आरोपींवर अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे. अपहरणाच्या घटनेचा बंगल्यामधील व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. हा बंगला आरोपींच्या बहिणीचा आहे. गुन्ह्यात वापरलेली दोरी, कापड व मोबाईल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.’

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शिरूर तालुक्यातील गावावाल्याने रचला कट; अपहरण, महिलेसोबत फोटो काढून…

शिरुर तालुक्यात बंदूकिचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन जीवघेणा हल्ला…

शिरूर-हवेली मतदार संघामधून आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल?

View Results

Loading ... Loading ...