shirur-tehsil-office

शिरूर! भ्रष्टाचारी तलाठ्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप करणार उपोषण…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे) : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील तलाठ्यांचे रोज नवनविन कारनामे समोर येत असून त्यांनी नोंदीसाठी अनेक नागरीकांना लुटल्याची खमंग चर्चा तालुकाभर चांगलीच रंगली आहे.

तलाठी वरीष्ठांच्या आदेशालाही जुमानत नसून नागरीकांना लुटतच आहे. सणसवाडी तलाठी कार्यालय व कोरेगाव भीमा तलाठी कार्यालय मधील अवैध नोंदी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम विरुद्ध कामकाजाबाबत सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप हे येत्या १०डिसेंबर पासून शिरूर तहसील कार्यालयात उपोषण सुरू करणार आहेत.

वरीष्ठ अधिकारी या लाचखोर तलाठ्यावर काय कारवाई हे पाहणे महत्वाचे ठरेल. तसेच त्यांचा त्या सजातून हकालपट्टी होण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहे. हे तलाठी पैसे दिल्याशिवाय नोंदच करत नाही. त्यांनी लोंकाना लुटून ‘विशाल’ कमावलेल्या ‘काळया’ पैश्याची लाल लुचपत विभागामार्फत चौकशी लावणार असल्याचेही सुभाष जगताप यांनी सांगितले आहे.

शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘प्रलंबित असणाऱ्या नोंदीचे काम प्रगतीपथावर असून सणसवाडी व कोरेगाव भीमा तलाठी यांना प्रलंबित नोंदींबाबत व गुंठेवारीच्या नोंदीबाबत खुलासा मागितला आहे.’

शिरूर! लाललुचपतची कारवाई होऊनही ‘त्या’ तलाठ्याची हौस काही भागेना…

शिरूर तालुक्यातील ‘तलाठी, मंडल आधिकारी जोमात नागरीक कोमात’ अशी अवस्था…

शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी होतेय टाळाटाळ…

Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त…

शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले

जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

शिरुर-हवेली मतदारसंघात माऊली कटके यांचा दणदणीत विजय…