शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील मार्केटयार्ड परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल परजिल्ह्यातून हस्तगत करताना शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेली कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. शिताफीने केलेल्या या कारवाईत मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा बापू गजानन थोरात (वय ३५, रा. बोळेगाव, ता. व जि. अहिल्यानगर) यास नागापूर एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून होंडा शाईन (क्र. MH13 BG 6927) ही चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
फिर्यादी यांनी २८ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० दरम्यान होंडा शाईन मोटारसायकल मार्केटयार्ड येथील मोकळ्या जागेत हँडल लॉक करून पार्क केली होती. मात्र अज्ञात चोरट्याने ती लबाडीने चोरून नेली. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे गु.र. नं. ३६६/२०२५, भा.ज.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथक गठित करून पोसई शुभम चव्हाण यांना तपासाची जबाबदारी दिली. चव्हाण आणि त्यांच्या टीमने शहरातील विविध CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण यांचा वापर करत आरोपीचा माग काढला. तपासात उघडकीस आले की, सदर गुन्हा बापु गजानन थोरात या सराईत चोरट्याने केला असून त्याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, व अहिल्यानगर येथे एकूण ९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे तो पोलिसांच्या रडारवर आधीपासूनच होता.
आरोपीकडून होंडा शाईन (क्र. MH13 BG 6927) ही काळ्या रंगाची मोटारसायकल, तिचा व्हेहीकल नंबर ME4JC36JJC7184343 व इंजिन नंबर JC36E7280444 सह जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार शिवाजी खेडकर हे करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर तसेच पोलिस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांच्या गुन्हे शोध पथकाने केली.
शिरूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता, तांत्रिक कौशल्य व संयमित तपासकार्यामुळे पुन्हा एकदा जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ झाला आहे. ही कारवाई सराईत गुन्हेगारांना स्पष्ट इशारा आहे की, गुन्हा करून सुटका शक्य नाही.
गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह एकजण अटकेत; शिरूर पोलीसांची धडक कारवाई
शिरूर तालुक्यातील विवाहित महिलेची वटपौर्णिमेच्या दिवशी आत्महत्या…
शिरूर शहरात मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; पाच गुन्ह्यांचा उलगडा
शिरूरमध्ये मोठा गुटखा साठा उघड; १.१६ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त
शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात सुपूर्द