शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे सत्र वाढ
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे सत्र वाढत असताना दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील युवकावर प्रेमविवाहाच्या रागातून तीन जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथील २९ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडसह, काठीने मारहाण करून दुखापत करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश बबन निचित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडनेर खुर्द (ता.शिरूर) येथील पाच जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश निचित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आपण वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथील गावातील शिवशंभो हॉटेल मध्ये बसलेले असताना गावातीलच ऋतिक राजेंद्र बोऱ्हाडे , विशाल चंद्रकांत गोफणे व सुशांत योगेश बोऱ्हाडे हे तिघेजण मला मोटारसायकलवर बसवून गावातील गणपती माळ येथे घरी घेऊन गेले. यावेळी ऋतिक बोऱ्हाडे , विशाल गोफणे, सुशांत बोऱ्हाडे यांचेसह घटनास्थळावर उपस्थित असलेले त्यांचे दोन साथीदार चंद्रकांत गोफणे व योगेश बोऱ्हाडे यांच्यासह मला विनाकारण पाचही जणांनी मिळून त्यांचेकडील हातात असणाऱ्या लोखंडी रॉड, काठीने पाठीवर, हातावर तसेच दोन्हीही पायांवर मारहाण केल्याने दुखापत झाली असून तद्नंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची देखील आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी आरोपिंवर भारतीय दंड संहिता कलम १९१ (२), १८९ (२) , १९१ (३), ११८(१), ३५२ ,३५१ (२), ३५१ (३) प्रमाणे शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर करत आहेत.