रांजणगाव गणपती येथे शेळके नगरमधील रस्त्याचे भुमिपुजन उत्साहात संपन्न

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवासेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब कांतीलाल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातुन रांजणगाव गणपती येथील शेळके नगर परिसरातील नवीन भांबर्डे रोड ते जुना भांबर्डे रोड या रस्त्यासाठी १०.५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. या विकासकामाचे भुमिपुजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.

या रस्त्याच्या कामामुळे शेळके नगर परीसरातील नागरीकांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असुन, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी कायमस्वरुपी दुर होणार आहेत. त्यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या भुमिपुजन कार्यक्रमास बापुसाहेब शिंदे, विक्रम पाचुंदकर, अजय गलांडे, देविदास शेळके, कैलासराव शेळके, वैभव खेडकर, प्रताप खेडकर, सुनील खेडकर, आनंदा खेडकर, संदीप कुटे, रावसाहेब पाचुंदकर, विलास बत्ते, सचिन कुटे, दादासाहेब मैद, निलेश कड, बाळासाहेब शेळके, संभाजीराव शेळके, पंडितराव लवांडे, गणेश शिंदे, गणेश देवकर, नंदकुमार शेळके, दत्तात्रय बत्ते, आदित्य सणसे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच अर्चना शिंदे, सारिका शेळके, जया बत्ते, मंगल ढसाळ, अनिता गवते, पुनम खताळ, शोभा जायकर, प्रगती नागरगोजे, रुशाली चौरे, भाग्यश्री लोहार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या रस्त्याच्या कामामुळे परिसराचा वेगाने विकास होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला व माननीय नेतृत्वाचे आभार मानले.