शिरुर तालुक्यात दशक्रिया विधिला रंगला राजकिय कलंगीतुरा…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): दशक्रिया विधी, लग्ण सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक कार्यक्रमांची उद्घाटने ही राजकिय लोकांसाठी प्रचारासाठी व्यासपीठे बनली आहे. नुकतेच सविंदणे येथील प्रसिद्ध व्यावसायिक व माजी सरपंच वसंत पडवळ यांच्या वडीलांच्या दशक्रियेनिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस, सेना, भाजप, शिंदे गट असे सर्वपक्षीय मात्तबर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दशक्रियापूर्वी 2 दिवस आधी पिंपरखेड (ता. शिरुर) या गावी पोखरकर यांच्या दशक्रियेच्या दिवशी देवदत्त निकम यांनी गणेश जामदार यांना तुम्ही नेमके कुठल्या शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहता अशी विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना जामदार यांनी सविंदणे येथे पडवळ यांच्या दशक्रियेमध्ये मुळ शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहत असल्याचे उत्तर दिले.

जामदार यांच्या भुमिकेबदद्ल देवदत्त निकम, पोपटराव गावडे व इतर मान्यवरांनी दाद दिली व उपस्थितांमध्ये हास्य निर्माण झाले. त्यावेळी शिंदे गटात गेलेले अरुण गिरे यांनी विकास कामासाठी आम्ही सत्ताधारी गटात गेल्याचे उत्तर दिल्याने जनतेमध्ये हशा पिकला.

यावेळी आमदार अशोक पवार, मा. आमदार पोपटराव गावडे, प्रदिप वळसे, शेखर पाचुंदकर, देवदत्त निकम, गणेश जामदार, अरुण गिरे, डॉ . सुभाष पोकळे, दामुआण्णा घोडे, संजय पोखरकर व अनेक गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

बेट भागात आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. विविध पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याने अनेक सार्वजनिक ठिकाणी कुरघोडी व टिकाटिप्पणीचे राजकारण होत असल्याचे पहावयास मिळत आहे.