शिरुर तालुक्यात वाढला तापमानाचा आकडा; किती ते पहा….

शिरूर तालुका

शिक्रापूर सह परिसरात तापमान चाळीसच्या वर

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पुणे जिल्हयासह अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत असताना मात्र कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असल्याने शिरुर करांची लाहीलाही झाली असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागला आहे.

महाराष्ट्र राज्यात चांगलाच उन्हाळा जाणवू लागलेला असताना कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी देखील खालावली आहे, काही ठिकाणी पाउस पडत असताना काही ठिकाणी तीव्र ऊन जाणवत आहे. पुणे जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश असताना शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कमाल तापमान 40 असल्याने नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागला असून नागरिकांची लाहीलाही झाल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी उष्णतेमुळे नागरिकांनी घरास बसने पसंत केल्याचे रस्ते व बाजारपेठा देखील ओस पडल्याचे दिसून आले. तर वातावरणात देखील मोठा बदल झाल्याचे दिसून आले असताना या महिन्यात आजचे तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी; डॉ. शरद लांडगे

उष्णतेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर त्याचा परिणाम मानवी शरीरावर होऊन शरीरातील पाणी कमी होते त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, पाण्यात मीठ, साखरेचा वापर करावा विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळात घरात रहावे तसेच विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. शरद लांडगे यांनी केले आहे.