विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा; गणेश फरताळे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाटचाल करत असताना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या महापुरुषांच्या आदर्श घ्यावा, असे मत शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी व्यक्त केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय युवा दिन विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम दरम्यान बोलताना शिवव्याख्याते गणेश फरताळे बोलत होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ, सचिन बेंडभर, संदीप वाबळे, मल्हारी वाबळे, सुरेखा वाबळे, सतीश कोठावळे, प्रकाश वाबळे, भगवान वाबळे, केशव वाबळे, अंकुश वाबळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राजमाता जिजाऊं विषयी माहिती सांगत शिवरायांना घडवण्यात जिजाऊंची भूमिका स्पष्ट करत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंदांविषयी त्यांनी आपले विचार स्पष्ट करत त्यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या असून शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या आदर्श घेत आपल्या भावी आयुष्याची वाटचाल करावी आणि जीवनात यशस्वी व्हावे, असा मोलाचा सल्ला देखील शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट दरंदले यांनी केले तर किरण अरगडे यांनी आभार मानले.