घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी…?   शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातुन दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु असतानाही संबंधित प्रशासनाच्या कारवाईचा पत्ता नसल्याने संताप व्यक्त होत आहे. धरण परिसरातील वाळू अक्षरशः ओरबाडली जात असताना अधिकारी आणि यंत्रणा नेमकी कोणाची वाट पाहत आहेत…? असा […]

अधिक वाचा..
dr-namdev-shendkar

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी तसेच विविध शिष्यवृत्ती विषयक उपक्रमांमुळे पुणे जिल्हा मार्गदर्शक ठरत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी आहे, असे पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. नामदेव शेंडकर यांनी म्हटले आहे. शिरूरमध्ये मुख्याध्यापक सहविचार सभेत ते बोलत […]

अधिक वाचा..

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले असून, या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांची भेट घेऊन या घटनेबाबत चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हल्ल्याची चौकशी करून […]

अधिक वाचा..

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, केंद्रीकृत प्लेसमेंट सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कौशल्यविकास उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद, पारदर्शक व प्रभावी निराकरण करण्यासाठी प्रस्तावित ‘Students Grievances Portal’ ची कार्यवाही तातडीने गतीमान करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘Students Grievances Portal’च्या कामकाजाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्यस्तरीय धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सक्षम इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासह विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि नवउद्योग निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. गणेशोत्सव काळात भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विधान भवन येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) […]

अधिक वाचा..

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणाची सुरुवात शिंदे यांनी ‘नमस्कार-जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल, सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजना आणि भारत-ब्रिटन संबंधांवर भाष्य केले. […]

अधिक वाचा..

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर झाल आहे. अशा काळात काही लाख रुपये किमतीचा सोन्याचा दागिना हातात सापडल्यानंतर त्याचा मोह आवरणे अनेकांसाठी कठीण असते. मात्र, आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मनात कोणताही लोभ न ठेवता इस्त्रीच्या कपड्यात सापडलेला अडीच तोळ्यांचा सोन्याचा गंठण त्याच्या मुळ मालकाला […]

अधिक वाचा..

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे. एजंटिक AI, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ […]

अधिक वाचा..