महिलांना सन्मान, योग्य संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करावा; सुनेत्रा पवार 

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज विधान परिषदेत केली. दरम्यान महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याची ग्वाही देत राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी केले.आंतरराष्ट्रीय महिला […]

अधिक वाचा..

पावसात भिजून-घाण पाण्यातून वाट काढत घरी आलात आणि लक्षण दिसल्यास लगेच डॉक्टरांकड जा

दडी मारुन बसलेला पाऊस अचानक सुरू झाला आहे. त्यानंतर तर राज्याच्या बऱ्याच भागात तुफानी पावसाला सुरुवात झाली. पाऊस आला की तो गारवा घेऊन येतो हे जरी खरे असले तरी, त्यासोबत होणारे डास आणि येणारी आजारपणं घरोघरी पाहायला मिळतात. पावसाळ्यात कधी दमट तर कधी उष्ण हवा असते. तर कधी अचानक हवेत गारवा येतो. हवामान, डास, ओलेपणा […]

अधिक वाचा..

आखाती युद्धाची झळ भारतात; गॅस टंचाईवरून रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा 

पुणे: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या ११ दिवसांच्या भीषण युद्धाची झळ आता सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू लागली आहे. आखाती देशांमध्ये युद्धाची स्थिती गंभीर बनल्याने तेथून भारताला होणारा खनिज तेल (क्रूड ऑइल) आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. परिणामी महाराष्ट्रासह देशभरात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला […]

अधिक वाचा..

खाकीवर हल्ला; पोलीस कर्मचाऱ्याला ७-८ जणांकडून बेदम मारहाण

राहुरी (अहिल्यानगर): अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर ७ ते ८ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास वैराळ असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जणांनी एका […]

अधिक वाचा..

ब्रेकअपच्या रागातून सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून बहिणीची ४० वार करून हत्या; आईवरही प्राणघातक हल्ला

मुरादाबाद (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या सख्ख्या बहिणीची चाकूने तब्बल ४० वेळा वार करून निर्घृण हत्या केली असून आईवरही प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक मल्होत्रा नावाच्या तरुणाने आपली जुळी बहीण हिमशिखा मल्होत्रा […]

अधिक वाचा..

भरधाव आरएमसी ट्रकची दुचाकीला धडक; १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे: पुणे शहरालगत असलेल्या सुसगाव परिसरात मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. सुस-नांदे रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने १८ वर्षीय तरुणीचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंजली शंकर साळवे असे मृत पावलेल्या […]

अधिक वाचा..

महामंडळ म्हणजे पत्रकारांसाठी ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम वैधानिक व्यवस्था उभी करा; एस. एम. देशमुख

मुंबई: पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्याऐवजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या धर्तीवर महाराष्ट्रात सक्षम वैधानिक व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पत्रकारांसाठी […]

अधिक वाचा..
bapu-kale-shatak-movie

शिरूर! गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ‘शतक’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन…

शिरूर: न्हावरा (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी या उद्देशाने “शतक ” या देशभक्तीपर चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हा उपक्रम भाजपा पदवीधर आघाडी उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष राहुल गव्हाणे यांच्या पुढाकारातून तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली गव्हाणे आणि राहुल गव्हाणे मित्र परिवार यांच्या सहकार्याने […]

अधिक वाचा..

सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील जनुना येथे दुर्दैवी घटना

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना येथे सापाला जीवदान देण्याच्या प्रयत्नात सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्थानिक सर्पमित्र मंगेश प्रकाश कांबळे (वय ३२) यांना सापाने दंश केल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्पमित्रांमध्ये शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश कांबळे हे जनुना गावातील प्रसिद्ध सर्पमित्र म्हणून ओळखले […]

अधिक वाचा..

दिव्यांगांसाठी मोठा दिलासा! स्वयंरोजगारासाठी थेट १५ हजारांची मदत

मुंबई: राज्यातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना थेट १५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेक दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून स्वावलंबनाकडे मोठे पाऊल टाकले जाणार आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या नव्या उपक्रमाची माहिती दिली. […]

अधिक वाचा..