कोण बनणार मुंबईचा महापौर? राजकीय समीकरणांचा खेळ!

“या चिमण्यांनो, परत फिरा रे…” मुंबईच्या हितासाठी! मुंबई: मुंबईच्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीय समीकरणे प्रचंड वेगाने बदलत असून, प्रत्येक पक्ष आपापली ताकद अजमावत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही शिवसेनेतून काही नेते बाहेर पडले, काहींनी वेगळे राजकीय मार्ग निवडले. राज ठाकरे यांनी “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई; कोट्यावधींच्या मुद्देमालासाह आरोपीला अटक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरूर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक कारवाई केली आहे. बाबुरावनगर, शिरूर परिसरात एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर राबविण्यात आलेल्या छाप्यात तब्बल १ किलो ५२ ग्रॅम एमडी जप्त […]

अधिक वाचा..
bhumi-abhilekh-shirur

मोठा कट उघड! शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील ३ कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गंभीर गुन्हे दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील पारोडी येथील वडिलोपार्जित शेतजमीन बळकावण्यासाठी तब्बल सहा दशकांपूर्वीच्या एकत्रिकरण नोंदींमध्ये छेडछाड करून बनावट जबाब, खोट्या सह्या व शिक्के तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एकूण १३ जण आरोपी आहेत. विशेष म्हणजे या कथित […]

अधिक वाचा..

ZP निवडणुक; कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वाचे आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्या जयश्री कोहकडे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल (दि १७) रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कारेगाव ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच व उपसरपंच, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त काही विशेष व्यवस्था करावी लागेल. भौतिक व सांसारिक दृष्टिकोनात बदल जाणवेल. आत्मसन्मानाशी संबंधित काम करताना सावधगिरी बाळगा. कामातील एखादी चूक अडचण निर्माण करू शकते. आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस अतिशय उत्तम आहे. मानसन्मान व प्रतिष्ठेत वाढ होईल. धनलाभाचे योग आहेत. […]

अधिक वाचा..

आयुर्वेदातील चिकित्सा पध्दती

सध्याच्या काळात आजाराच्या मुळाशी जाऊन आजार दूर करणारी आयुर्वेद चिकित्सा पध्दती जास्त गुणकारी आहे. आजार कायमचा बरा करणारी आयुर्वेदातील चिकित्सा पध्दती म्हणजे विद्धकर्म व अग्निकर्म. एखाद्या पिझ्झा खाणाऱ्या लोकांना पिझ्झा बद्दल अतीव आकर्षण असते. त्यातले चीझ, मैदा, अतिरिक्त कॅलरीज, बेक केल्यामुळे पचण्यास जड असे कितीही तोटे असले तरीही हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्याच प्रमाणे […]

अधिक वाचा..

‘रन फॉर हर’ निमित्त शिरूरमध्ये परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंह यादव यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

शिरूर (नितीन थोरात): “Run For Her” या उपक्रमाच्या निमित्ताने शिरूर येथील गंगा एज्युकेशन सोसायटी व Healing Lives या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातील शौर्यगाथा अनुभवलेल्या, वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी परमवीर चक्राने सन्मानित झालेले कारगिलवीर योगेंद्रसिंह यादव यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात योगेंद्रसिंह यादव यांनी बालपणापासून […]

अधिक वाचा..

कोल्हापूरचे माजी गोकुळ अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई: कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विश्वासराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशावेळी शिरोली दुमला […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर

मुंबई: राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली असून, सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार केला जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

१ ग्लास कोमट पाण्यात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं

तूप हा पदार्थ फक्त चवीसाठी खाल्ला जाणारा नाही तर तब्येतीसाठी अमृतासमान आहे. अनेक वर्षांपासून भारतात तुपाचा समावेश आहारात केला जात आहे. चपाती, भाकरी किंवा वरण भातावर तूप घातल्याशिवाय अनेकांना जेवणच जात नाही. तुपाच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात अनेक आजारांपासून बचावसुद्धा होतो. तुपाचे नियमित सेवन केल्यानं हाडं मजबूत राहता, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. आंतरराष्ट्रीय […]

अधिक वाचा..