जेवणाची सुरुवात कशी करावी

प्रत्येकाची सवय असते की जेवण झाले की काही गोड धोड खाण्याची. हे फार आधीच्या काळापासून चालत आले आहे. हिंदू शास्त्रात आणि आयुर्वेदात देखील हे आढळून येते. गोड खाण्याविषयी सर्वांनाच त्याचे गुण ठाऊक आहे पण जेवणाच्या आधी तिखट पदार्थ का खातात हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तिखट पदार्थ खाण्याचे फायदे  १) जेवण्यात तिखट पदार्थ आधी […]

अधिक वाचा..

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचा मार्ग मोकळा

एसटी महामंडळाकडून स्मारकासाठी जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश संगमनेर: संगमनेर शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना अखेर मूर्त स्वरूप आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एसटी महामंडळ आणि संगमनेर नगरपालिका यांच्यात जागा हस्तांतरणाचा करार आज करण्यात आला. स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेली […]

अधिक वाचा..

पुनावळेत बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; १० वर्षांपासून विनापरवाना करत होता मजुरांवर उपचार

पुणे : पुण्यातील पुनावळे परिसरात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना तब्बल १० वर्षांपासून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका कथित बनावट डॉक्टरला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. भागवत निषाद असे या व्यक्तीचे नाव आहे. तो पुनावळे परिसरातील विविध बांधकाम साईट्सवर जाऊन तेथील गरीब आणि गरजू […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल अद्याप बाकी; कुणबी नोंदी आणि 10 टक्के SEBC आरक्षणामुळे नेमके काय साध्य झाले?

मुंबई : महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ राजकीय आरक्षणाचा विषय राहिलेला नसून सामाजिक न्याय, ऐतिहासिक नोंदी, घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन कसोटी यांचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. मराठा समाजाच्या दीर्घ आंदोलनानंतर राज्य सरकारने स्वतंत्र 10 टक्के SEBC आरक्षणाचा कायदा करण्यासोबतच ऐतिहासिक कुणबी नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्गही पुढे केला. मात्र, या दोन्ही […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवार यांचा निर्धार; ‘दादा उद्योगिनी’ आणि ‘NCP यूथ स्किल्स’ ॲपचे लोकार्पण

पुणे: “दादांनी तुम्हाला आणि मला दिलेला विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणे त्यांच्या शिकवणीत बसत नाही. दादांनी पाहिलेले प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न आणि पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे. आज आपण ॲपचे उद्घाटन करत नाही, तर एका दूरदृष्टीला पुढे घेऊन जात आहोत,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. […]

अधिक वाचा..

कसब्यात शिंदे गटाला भाजपचा धक्का; पदाधिकारी भाजपमध्ये, धंगेकर म्हणाले…

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत राजकीय स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला भाजपने धक्का दिल्याचे चित्र आहे. कसब्यातील शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वैष्णवी किराड यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची […]

अधिक वाचा..

चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा उतारा; खड्डे बुजविण्याला प्राधान्य

प्री-कास्ट रस्ते, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर करण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश; १४ विभागांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना मुंबई: चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यातही रस्ते दुरुस्तीची कामे वेगाने करता यावीत यासाठी प्री-कास्ट रस्ते आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश […]

अधिक वाचा..

मी मोठा झाल्यावर शिरूरचा आमदार होणार; चिमुकल्या शौर्यचा संकल्प

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): स्वप्नांना वयाचे बंधन नसते, हे दाखवून देणारा भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग शिरूर तालुक्यातील सातकरवाडी येथे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला. जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या शौर्य रवींद्र टेमगिरे याने भविष्यात शिरूर तालुक्याचा आमदार होऊन आपल्या गावासह संपूर्ण तालुक्यासाठी मोठे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शौर्यने आपल्या निरागस शब्दांत मोठे […]

अधिक वाचा..
shikrapur traffic

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा उद्योगांना फटका; चाकणनंतर शिरुर औद्योगिक वसाहत स्थलांतराची भीती…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीचा थेट फटका रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत, सणसवाडी आणि कोरेगाव परिसरातील उद्योगांना बसू लागला आहे. कच्चा माल, तयार माल, अवजड वाहने तसेच हजारो कामगारांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे उद्योगांच्या उत्पादन व्यवस्थेवर आणि मालवाहतुकीच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. या गंभीर […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलांना ऑनलाइन जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग; नीलम गोऱ्हेंचे राज्यपालांना निवेदन

मुंबई: राज्यातील अल्पवयीन मुला-मुलींना ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडिया आणि चॅटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग, लैंगिक शोषण तसेच अमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समन्वित राज्यस्तरीय उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १५ ऑगस्ट रोजी राज्यपालांना निवेदन देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांची विशेष बैठक […]

अधिक वाचा..