शिरुर; क्रिकेट स्पर्धेत बक्षिसे देण्याचे आश्वासन पण बक्षीसाची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या अनेक गावात क्रिकेटच्या स्पर्धेची रणधुमाळी चालु आहे. शिरुर तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणारे अनेक राजकीय पुढारी या क्रिकेट स्पर्धेसाठी रोख रक्कम किंवा इतर बक्षीसे जाहीर करत असतात. काहीजण ती बक्षिसे देतात. मात्र काहीजण बक्षीस जाहीर करुन नंतर ती बक्षिसे देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे आयोजक मात्र […]

अधिक वाचा..

पठ्यान आईला शब्द दिला…तुझ्यासाठी आता जिल्हा पातळीवरच पद आणणार अन शब्दच खरा केला…

शिंदोडी (तेजस फडके) सन २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या आईचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला. हा पराभव त्याच्यासहीत सगळ्यांनाच्याच मनाला चटका लाऊन गेला. पण भावानं आईला शब्द दिला. ‘आता गाव पातळीवर नाही लढायच…तुझ्यासाठी जिल्हा पातळीवरच पद आणणार’… अन पठ्यान दिलेला शब्दच खरा केला. सन २०२३ च्या राज्यसेवा परीक्षेत त्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) पदी […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यातही गरमागरम आल्याचा चहा पिणारच, काही होत नाही म्हणता 

मस्त गरमागरम चहा हा आपल्यापैकी अनेकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. काहीजणांच्या दिवसाची सुरुवातच चहा पिऊन होते. यातही जर आलं घातलेला गरमागरम, वाफाळता चहा असेल तर स्वर्गसुखच. चहामध्ये आलं घातलं की चहाला एक वेगळीच टेस्ट येते. चहाचे चाहते आपल्याला संपूर्ण जगभरात पाहायला मिळतील. चहाचा घोट घेतल्याशिवाय चहाची तलफ जात नाही. चहा करताना त्या चहाची चव अधिक वाढून […]

अधिक वाचा..

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी

तापमान सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य निरोगी ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. जास्त घाम येणं डिहायड्रेशनचं कारण बनू शकतं, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ‘थ्री ड्रिंक थिअरी’ तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी थेट पुणे-नगर महामार्गावर

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी पुणे-नगर महामार्गालगतच सोडण्यात येत असुन त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत कारेगाव ग्रामपंचायत असल्याने औद्योगिक वसाहतीतुन मोठया प्रमाणात या ग्रामपंचायतला कर मिळतो. गावात अंतर्गत गटार लाईनचे काम झालेले आहे. परंतु या गटार लाईनचे आउटलेट कारेगाव ग्रामपंचायतचे थेट पुणे-नगर महामार्गावर सोडले आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या […]

अधिक वाचा..

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीतील निर्वाचन सदन येथे भेट घेतली. ही भेट निवडणूक आयोगाकडून विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी सुरू असलेल्या संवादाचा एक भाग आहे. […]

अधिक वाचा..

कॅशलेस उपचार आता होणार सोपे आणि जलद! 1 तासात मंजुरी, 3 तासांत क्लेम सेटलमेंट

केंद्र सरकारचा मोठा निर्णय संभाजीनगर: रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आनंदाची बातमी हेल्थ इन्शुरन्स क्लेममध्ये होणाऱ्या उशीरामुळे त्रस्त लोकांसाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता विमा कंपन्यांना 1 तासात कॅशलेस मंजुरी आणि 3 तासांत क्लेम सेटल करणे बंधनकारक होणार आहे. सरकारची योजना काय प्राप्त माहितीनुसार, विमा क्षेत्राचे काम अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी *भारतीय मानक ब्युरो* […]

अधिक वाचा..

नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

‘झिरो माईल’ होणार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र  मुंबई: नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प येथे परफार्मन्स गॅलरी, झिरो मॉईल सुशोभिकरण, कॉटन मार्केट विकास, फुल मार्केट, कारागृह स्थलांतरण ही कामे महानगराच्या चौफेर विकासाला हातभार लावणारी आहेत. यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित कामे तत्काळ सुरु […]

अधिक वाचा..

शेताच्या 7/12 वर पत्नी बनणार सहहिस्सेदार; जाणून घ्या…

संभाजीनगर: महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि शेतीमालमत्तेतील त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सुरू केलेली ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ आता प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश काय आहे महिलांना शेतीमालमत्तेतील सहहक्क मिळवून देणे ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण महिलांना कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये हक्काची भूमिका देणे महिलांचा शेतीतील अधिकार अधिकृत करणे पत्नीचे नाव शेताच्या ७/१२ वर का नोंदवावे महिलांना […]

अधिक वाचा..

तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी; पणन मंत्री जयकुमार रावल 

मुंबई: राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे केली आहे. तसा प्रस्ताव पणन विभागाच्या माध्यमातून केंद्राला पाठविण्यात आला आहे. राज्यात 1 लाख 37 हजार […]

अधिक वाचा..