शिरुर शहरातील कॅफेमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील वर्तन, दोन कॅफे चालकांवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरामध्ये अनेक कॅफे असुन काही व्यक्तींनी कॅफे तयार करुन कॅफे मधील बैठक व्यवस्थेमध्ये बदल करुन तेथे पार्टीशन करुन कॉलेज व शाळकरी अल्पवयीन मुला-मुलींना एकांतामध्ये बसण्याची व्यवस्था करुन त्या कॅफेमध्ये अल्पवयीन कॉलेज व शाळकरी मुलामुलींना असभ्य आणि अश्लील वर्तन करण्याकरीता पार्टीशन मधील लाईट घालविणे. त्यांना एकांत देणे आणि त्यांना अश्लील कृत्य करण्यास […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला रांजणगाव पोलीसांनी केली चार तासात अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथे भाड्याने राहणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरुन खून केला. त्यानंतर तो फरार झाला होता. आरोपी पळुन जाण्याच्या तयारीत असताना रांजणगाव MIDC पोलिसांनी त्याला चार तासात तात्काळ अटक केली आहे. अशोक भिमराव रंधवे (वय 50) रा. नेवासाफाटा ता.नेवासा जि. अहमदनगर असे अटक केलेल्या […]

अधिक वाचा..
crime

वाघोलीत समलैंगिक संबंधातून कोयत्याने वार करून युवकाची हत्या…

पुणे : बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय युवकावर कोयत्याने वार करण्यात आल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. ही हत्या समलैंगिक संबंधातून झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. मृत्युमुखी पडलेला युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढेबोल्हाई येथे एका […]

अधिक वाचा..
shirur crime

न्हावरा-केडगाव रस्त्यावर टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली; दोघांना अटक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): एका हॉटेलमध्ये कामगाराने काम करण्यासाठी आगावू रक्कम घेतली होती. पैसे घेऊनही तो काम करत नसल्याने हॉटेल चालवणाऱ्या दोघांनी मारहाण करून त्याचा खून केला होता. मृतदेह न्हावरा-केडगाव जाणाऱ्या रोडवरील पारगाव पुलाखाली भीमा नदीपात्रात फेकून दिला होता. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, […]

अधिक वाचा..
shirur-accident

भीषण अपघात! शिरूर तालुक्यात एसटीच्या चाकाखाली घुसली दुचाकी…

कोरेगाव भीमा: पुणे-नगर महामार्गावरील वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथे एसटी बस व दुचाकी यांचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरील एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की दुचाकी एस टी च्या चाकाखाली घुसली आणि एसटी रस्ता दुभाजकावर शिरली. एसटीचा पुढील भाग तुटला असून, जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल […]

अधिक वाचा..
sand-mafia

शिरुर तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली लाखों रुपयांची वाळूचोरी…

शिंदोडी (तेजस फडके): राज्यातील गोरगरीब जनतेला कमी पैशात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने अनेक ठिकाणच्या वाळूचे रीतसर लिलाव केले. विविध ठिकाणी त्यांचे ठेकेही दिले. परंतु त्यातुन सर्वसामान्य लोकांचा फायदा होण्याऐवजी वाळूच्या ठेकेदारांचाच फायदा होताना दिसत आहे. शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य गोर गरीब जनतेला कमी दरात उपलब्ध व्हावी या उद्देशाने घोड धरणातील निमोणे आणि चिंचणी येथे वाळू […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमा येथे विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; रस्त्यावर रक्ताचा सडा…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर एका दुचाकीवर असणाऱ्या चार विद्यार्थ्यांना अपघात झाला आहे. यामध्ये चारही अल्पवयीन मुले जखमी झाली असून, त्यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले. एक तीन चाकी मालवाहतूक रिक्षा आणि विद्यार्थ्यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला आहे. चारही अल्पवयीन मुले जखमी झाल्याने पुणे-नगर रस्त्यावर रक्तच रक्त […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी फोनवरुन मालाची ऑर्डर देवुन फसवणुक करणा-या महाठकाचा केला फर्दाफाश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फसवणुकीची वेगवेगळी उदाहरणे समोर येत असुन” जस्ट डायल” वरती फोन करून वेगवेगळ्या परिसरातील नामांकित बँटरी, कपडे, सिलाई मशिन, पेंड विक्रेते, तेल विक्रेते यांचे नंबर प्राप्त करून त्यावरून संबंधित दुकानदारांना फोन करुन मी दानशुर मारवाडी असुन मला अनाथ आश्रम, वृध्दाआश्रम यांना कपडे, बॅटरी, सिलाई मशिन, तेलाचे डब्बे असे दानधर्मासाठी पाहिजे आहेत. […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एकाचा मृत्यू…

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तळेगाव ढमढेरे येथे जुन्या ग्रामपंचायतीच्या जवळ दिलीप तुकाराम कुंभार हे सकाळी शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना, समोरून पुण्याहून तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारी पीएमपीएमएल बसने (एमएच १२ आरएन ६१६०) धडक दिली. या […]

अधिक वाचा..
arrest

चित्रपटाच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक…

अहमदनगर: एकाने मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 23 लाखाच्या मोबदल्यात कार देण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीने एका तोतया आरटीओ अधिकार्याला सोबत घेऊन शिक्षकाच्या बोगस कागदपत्रांवर सह्या घेण्याचा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. राजेश भगवान पवार (वय 33 रा. […]

अधिक वाचा..