शिरुर शहरातील कॅफेमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील वर्तन, दोन कॅफे चालकांवर गुन्हा दाखल

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरामध्ये अनेक कॅफे असुन काही व्यक्तींनी कॅफे तयार करुन कॅफे मधील बैठक व्यवस्थेमध्ये बदल करुन तेथे पार्टीशन करुन कॉलेज व शाळकरी अल्पवयीन मुला-मुलींना एकांतामध्ये बसण्याची व्यवस्था करुन त्या कॅफेमध्ये अल्पवयीन कॉलेज व शाळकरी मुलामुलींना असभ्य आणि अश्लील वर्तन करण्याकरीता पार्टीशन मधील लाईट घालविणे. त्यांना एकांत देणे आणि त्यांना अश्लील कृत्य करण्यास कॅफे चालक मुभा देत असल्याचे निदर्शनास आल्याने शिरुर पोलिसांनी दोन कॅफे चालकांवर कारवाई केली आहे.

शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या हि गोष्ट निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील आणि पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना अशा असभ्य आणि अश्लील वर्तन चालणाऱ्या कॅफेवर कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस पथकांने शिरुर शहरातील अशा कॅफेबाबत माहीती काढुन बाबुरावनगर येथील कॉर्नर कॅफे याचे चालक शुभम राजु दळवी (रा. सरदवाडी, ता. शिरुर जि. पुणे) तसेच शिरुर शहरातील एस टी. स्टॅन्ड समोर असणाऱ्या एम के कॅफे याचे चालक अविनाश पोपट शिंदे (रा. म्हसे खुर्द, ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे छापे टाकले या दोघांवर गुन्हा दाखल केला असुन या गुन्हयांचा पुढिल तपास पोलिस नाईक नाथासाहेब जगताप हे करत आहेत.

 

सदर कार्यवाही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुण्याचे अपर पोलीस अधिक्षक मितेश घटटे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, श पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस नाईक विशाल कोथळकर, पोलिस अंमलदार नितेश थोरात, अक्षय कळमकर यांनी केली आहे.

 

शिरुर शहर आणि आसपासच्या परिसरात अशा प्रकारचे कॅफे चालवुन अल्पवयीन कॉलेज व शाळकरी मुला-मुलींना असभ्य वर्तन करण्याकरीता कोणी जागा उपलब्ध करुन देत असल्यास त्याबाबत पोलीसांना माहीती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवण्यात येईल.

संजय जगताप 

पोलिस निरीक्षक, शिरुर