ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी शेतीपंप चोरी करणारे केले तडीपार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०२२ या कालावधीमध्ये टाकळीहाजी, रावडेवाडी, आमदाबाद व बेट भाग तसेच गोलेगाव, इनामगाव या परीसरासह शिरूर तालुक्यातुन विद्युत शेतीपंपांची (पाणी उपसा मोटारींची) मोठया प्रमाणावर चोऱ्या झाल्या होत्या. त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे दाखल झाले होते. इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरांचा शोध घेण्याकरता शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस निरीक्षकावर एट्रॉसीटी दाखल…

शिरुर (अरुणकुमार मोटे): एका प्रकरणात माघार घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने दबाव टाकल्याचं धक्कादायक प्रकरण नुकतच समोर आलं होतं. आरोपी पोलिस निरीक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत फिर्यादीला पोलीस ठाण्यात बोलवून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. माझ्या वरपर्यंत ओळखी असून तु माझं काहीच करू शकत नाही, असं धमकावलं होतं. यासंदर्भात फिर्यादीने वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात चक्क सहावीतील विद्यार्थिनी गरोदर

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे सहावीमध्ये शिक्षण घेणारी 14 वर्षीय विद्यार्थिनी अत्याचाराने गरोदर राहिल्याची खळबळजनक घटना समोर आली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी गावातील खाजगी रुग्णालयात नेण्यात […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरुन तुफान सिनेस्टाईल हाणामारी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून हातातील बिअरच्या मोकळया बाटल्यांनी, लोखंडी रॉडने, दगडाने , हाताने, लाथाबुक्यांनी तुफान सिनेस्टाईल हाणामारी झाली असून याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये आदित्य रघुनाथ सरडे, ( वय १८ वर्षे, ) रा. मंगलवाडी राजापुर ता श्रीगोंदा जि अहमदनगर याने 4 युवकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव गणपती येथुन इनोव्हा गाडीची चोरी

रांजणगाव गणपती:- रांजणगाव गणपती येथुन एक टोयाटो कंपनीची इनोव्हा गाडी चोरीला गेली असुन याबाबत राहुल निळोबा फंड (वय 37) रा.रांजणगाव गणपती, गायत्री भवन, आय सी आय सी आय बॅंकेच्या पाठीमागे ता शिरुर जि पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल फंड हे रांजणगाव गणपती येथील […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत शेतातील पिके नांगरुन कुटुंबाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे शेताच्या वादातून शेतकऱ्याच्या शेतातील पिकांसह जनावरांचा चारा 3 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान करत शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश पांडुरंग गवारी, दिपक दत्तात्रय गवारी, महेश दत्तात्रय गवारी, संभाजी पांडुरंग गवारी, भूषण गुरुनाथ गवारी, गुरुनाथ केरबा गवारी यांच्या विरुद्ध […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात नगरसेविका महिलेच्या पतीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) नजीक कासारी फाटा येथे जमिनीच्या मोजणीच्या वादातून नगरसेविका महिलेच्या पती सह त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मनोज दंडवते, अजय झेंडे, राकेश शेलार, प्रशांत शिंदे, बाजी हिंगमिरी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) नजीक कासारी फाटा परिसरात गणेश पवार […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांचा हैदोस; दुचाकीवरून आले अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले आहे. एका महिलेच्या गळयातील १,२०,००० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर शहराच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी वारंवार हैदोस घातला असून, यापुर्वी ७ते ८ वेळा महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे लंपास केले आहेत. रामलिंग ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत किरकोळ वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका शेतातील वादातून इसमाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून मारहाणीमध्ये व्यक्तीच्या हाताचे बोट तुटल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी दिनकर गोरडे व गुण्या उर्फ अभिनव संभाजी गोरडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हरीचंद्र रणदिवे यांच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन 2 महिलांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात काही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र […]

अधिक वाचा..