सोशल मीडियावर ओळख, लॉजमध्ये बोलावून लूट; फॅशन डिझायनरचा हनीट्रॅप रॅकेट उघड

बेळगाव: सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करून श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात ओढत लुटणाऱ्या हनीट्रॅप प्रकरणाचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात फॅशन डिझायनर असलेल्या दीपा अवतगी (वय ३३, रा. महालिंगपूर, जि. बागलकोट) हिला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार शिवानंद मठपती (रा. हुक्केरी, जि. बेळगाव) हा सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवानंद मठपती […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये अवैध गोहत्या प्रकरणातील सराईत आरोपी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अवैधपणे गोहत्या करून गोमांस विक्री करणाऱ्या तसेच वारंवार गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एका सराईत आरोपीवर कठोर कारवाई करत त्याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेत अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल केले असून या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक […]

अधिक वाचा..

शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यात उघडकीस आलेल्या हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या रॅकेट मधून लाईफ केअर हॉस्पिटलचा सर्वेसर्वा डॉ. आकाश सुभाष मलगुंडे (रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्यासह एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) करोडो रुपयांची ‘माया’ कमविल्याची ढोकसांगवी सह परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु […]

अधिक वाचा..

जेवणावरून वाद पेटला अन् सिलिंडरने ठेचून सहकाऱ्याचा जीव घेतला

पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात एका कामगाराची गॅस सिलिंडरने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोशी परिसरातील कुदळे वस्ती येथील बांधकाम प्रकल्पावर जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. या घटनेत बालाजी खंदाडे (वय २९) यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी प्रदीप गुंडारे (वय ३२) याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोशीमधील कुदळे […]

अधिक वाचा..

कट मारल्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; महिलेसह दोन अल्पवयीनांवर गुन्हा

पुणे: शहरातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी चालवताना ‘कट’ मारल्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत. या घटनेमुळे भाग्योदयनगर परिसरात काही काळ खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी […]

अधिक वाचा..

भर बाजारात तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा

परळी (जि. बीड): शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात भर बाजारात एका तरुणावर टोळक्याने लोखंडी रॉड व पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी पाच जणांविरोधात परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Parli शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात खरेदीसाठी […]

अधिक वाचा..

खाकीवर हल्ला; पोलीस कर्मचाऱ्याला ७-८ जणांकडून बेदम मारहाण

राहुरी (अहिल्यानगर): अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर ७ ते ८ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास वैराळ असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जणांनी एका […]

अधिक वाचा..

केबिनमध्ये एकटी ये म्हणत विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन

कोल्हापुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी वादात कोल्हापूर: कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी यांच्यावर विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. पीडित विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींमध्ये जोशी यांच्या वागणुकीबाबत धक्कादायक बाबी उघड झाल्या असून, या प्रकरणामुळे महाविद्यालयीन परिसरात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, प्रा. जोशी विद्यार्थिनींना “केबिनमध्ये एकटीच ये, तुला समजून […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमधील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये गैरप्रकारांचा आरोप; विद्यार्थीनीने पोलिसांकडे केली लेखी तक्रार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर येथील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत एका विद्यार्थ्याने शिरूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तक्रारीत परीक्षेच्या काळात काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा वापर करून गैरमार्गाने उत्तरं मिळविणे, तसेच परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत. […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणारे तिघे जेरबंद

मुंबई: इंस्टाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ केल्याच्या रागातून वडिलांनी मारहाण केल्यानंतर घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणाऱ्या तिघांना अखेर दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणातील तक्रारदार हे चालक असून ते कुटुंबासह गोरेगाव परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा स्थानिक खासगी शाळेत शिक्षण घेतो. […]

अधिक वाचा..