bhuienj-police

शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…

पुणे: पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या चार गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पकडले आहे. चौघेही शिरूर तालुक्यातील आरोपी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मौजे वेळे (ता. वाई, जि. सातारा) गावच्या हद्दीत ११ जून रोजी करुणा मंदिराच्या समोरील बाजूला पुणे ते सातारा रस्त्याच्या झाडीमध्ये अंधारात पाच जण मोटरसायकल बाजूला लावून बसले […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान…

एका रात्रीत केली तीन विद्युत रोहीत्रांची चोरी सविंदणे (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हाण दिले असून, एका रात्रीमध्येच तीन विद्युत रोहीत्रांची चोरी केली आहे. शिरूरच्या बेट भागात विद्युत रोहीत्र चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले असून, शिरूर पोलिसांनी महावितरण सोबत नुकतीच कवठे येमाई येथे १२ जून रोजी संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीसाठी […]

अधिक वाचा..

शिरुर; रांजणगाव येथील ‘अथर्व ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला…

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील भांबार्डे रस्त्यावरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी असणारे ‘अथर्व ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १६ लाख २५ हजारांचचा सोने व चांदीचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.   याबाबत रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि […]

अधिक वाचा..
malthan-goat

शिरूर तालुक्यात विद्युत वाहिनीच्या धक्क्याने शेळ्या व मेंढ्याचा मृत्यू…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) : मलठण (ता. शिरूर) येथे आज (मंगळवार) सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस पडल्याने शेतकरी उत्तम बाळासाहेब गोडसे हे शेळ्या घरी घेऊन जात असताना वीज वाहिनीचा धक्का बसून सात शेळ्यांचा तर दोन मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने मालक उत्तम गोडसे (रा.मलठण ) हे बचावले आहेत. मलठण येथील गोडसे हे शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन […]

अधिक वाचा..

तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील तळेगाव-न्हावरा रोडवर म्हाळुंगी फाट्यावरती ७ जून रोजी सायंकाळी ८ च्या दरम्यान सुखदेव सोपान मस्के (रा.टाकळी भीमा, ता.शिरूर) हे त्यांच्या मोटारसायकल वरून घोलपवाडी बाजूने घरी जात असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने मस्के यांचा उपचारापर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, ज्येष्ठ नागरिक सुखदेव मस्के […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर गजाआड…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिरूर शहरातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून तिघा चोरट्यांनी २० एप्रिल रोजी सुमारे दोन लाख रुपयांची रोकड व पद्मावती देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. अनेक ठिकाणी यांनी चोऱ्या केल्या […]

अधिक वाचा..
love

शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील करंजेनगर परिसरात महाविद्यालयीन प्रेमीयुगुलाने घरात एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर एक चिठ्ठी मिळाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गणेश सखाराम कुडले (वय 19, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे, मूळ, रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. […]

अधिक वाचा..
kawthe-accident

कवठे येमाई येथे अपघातात एक ठार, दुसरा गंभीर जखमी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील इचकेवाडी हद्दीत इको गाडी व टु व्हिलर गाडीची समोरासमोर धडक झाली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी (ता. ०५) ७ वा. चे सुमारास कवठे येमाईतील इचकेवाडी येथील […]

अधिक वाचा..
pune-police-legs

Video: शिरूर तालुक्यातील युवकाकडून पोलिसाने घेतले पाय दाबून…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताची सगळ्या देशभरात चर्चा असताना त्याच कल्याणीनगरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्याने चक्क शिरूर तालुक्यातील एका युवकाकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात […]

अधिक वाचा..
dead

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघांसह चिमुकला ठार…

शिक्रापूरः हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरा समोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणीकंद पोलिस चौकीच्या हद्दीत एस टी बसच्या अपघाताला एक दिवस हित नाही तोच दुसरा भीषण अपघात झाला आहे. हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव […]

अधिक वाचा..