शिरूर बसस्थानकात दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील ११ ग्रॅम सोन्याचे गंठण लंपास

गर्दीचा फायदा घेत अनोळखी महिला चोरटीचा डाव; ९४ हजारांच्या दागिन्यावर डल्ला, गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदुपारी गर्दीचा फायदा घेत एका अनोळखी महिला चोरट्याने ११ ग्रॅम वजनाचे सुमारे ९४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांची पार्किंग, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, बसथांबे, फुटपाथवरील अडथळे यावर व्यापाऱ्यांशी समन्वय बैठक

शिक्रापुर (ओंकार भोरडे): शिक्रापुर परिसरातील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमणे, अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा व मोकळ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी व्यापारी असोसिएशन व विविध दुकानांचे व्यापारी प्रतिनिधी यांची समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसह बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था, […]

अधिक वाचा..

विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा अखेर पर्दाफाश!

शिरूर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपी जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल, ३०० किलो तांब्याच्या तारा व मोटारसायकल जप्त शिरू (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युत रोहीत्र (डीपी) फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने महावितरण आणि शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. शेतातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यास अडथळे निर्माण होत होते. […]

अधिक वाचा..

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गावठी पिस्तुलांसह पंधरा जिवंत काडतुसे जप्त

यवत (प्रतिनिधी) अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि यवत पोलिसांनी संयुक्तरीत्या भांडगाव गावच्या हद्दीत सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन अवैध गावठी पिस्तुले, पंधरा जिवंत काडतुसे […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडा; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे चासकमान धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर पोहोचला असून, रांजणगाव गणपती परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी चासकमान धरणातून कोंढापुरी येथील तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे मोठे जाळे पुन्हा उघड!

दुधामध्ये विष कालवणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाईची नागरीकांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पारोडी येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे दुधाची आम्लता कमी करण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा व इतर घातक रसायनांचा वापर केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत उघड झाल्यानंतर तब्बल १२ […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये कामगाराचा छतावरुन पडून मृत्यू; दोन महिन्यांनंतर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC परिसरातील कारेगाव हद्दीतील एका कंपनीत उंचावर काम करताना एका कामगाराचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत कामगाराच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन तब्बल दोन महिन्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी मोहन सुरेश ढमढेरे (रा.तळेगाव ढमढेरे, ता.शिरुर, जि.पुणे) या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने औद्योगिक क्षेत्रातील […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांची धाडसी कामगिरी; डायल ११२ ला कॉल अन मायलेकरांचा जीव वाचवला

शिक्रापुर (ओंकार भोरडे) “माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत… लवकर या…” डायल ११२ वर आलेल्या या आर्त मदतीच्या कॉलने शिक्रापुर पोलिसांची यंत्रणा क्षणार्धात सतर्क झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीने धानोरे (ता.शिरुर) येथे धाव घेत हातात तलवार घेऊन पत्नी व मुलाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या या […]

अधिक वाचा..

करडे-कारेगाव रस्त्यावर मंगल कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग, श्रीमंतांच्या लग्नाचा थाट, सामान्य वाहनचालकांना शिक्षा…? 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांच्या वेळी चारचाकी वाहनांची बेशिस्त पार्किंग होत असल्याने या मार्गावर वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका रांजणगाव MIDC व परिसरातील कंपन्यांमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांना बसत असून, “लग्न मोठ्यांचे, पण त्रास मात्र गरिबांना” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व कामगार […]

अधिक वाचा..

FDA चा कृत्रिम दूध भेसळीच्या राज्यव्यापी रॅकेटवर मोठा घाव; पाच जिल्ह्यांत एकाच वेळी छापे

१.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त; २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट, २६ आरोपींवर गुन्हा; १३ जणांना अटक शिरुर (तेजस फडके) राज्यात कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर अन्न व औषध प्रशासनाने निर्णायक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे […]

अधिक वाचा..