रांजणगाव MIDC मधील कंपन्यांची तातडीने सुरक्षा तपासणी करा; नानासाहेब लांडे 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील हजारो कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार सुरक्षा नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की केवळ कागदोपत्री देखावा केला जातो, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. परिसरातील सर्व कंपन्या, कारखाने, गोदामे, बांधकामस्थळे आणि कंत्राटदार आस्थापनांची संयुक्त व अचानक सुरक्षा तपासणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांनी आठवडा बाजारात चोरट्यांचा डाव उधळला; दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

शिक्रापुर (ओमकार भोरडे) कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित सराईत चोरट्यांना शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचा डाव उधळून लावला. बाजार परिसरात नियमित सुरु असलेल्या पायी पेट्रोलिंगमुळे ही कारवाई शक्य झाली. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमाच्या अन्वये शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात खाकीतील माणुसकीचा झरा! पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी तीन वर्षीय चिमुकलीला दिले जीवदान

शिक्रापुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि संवेदनशीलतेमुळे तीन वर्षीय चिमुकलीचे संभाव्य मोठे संकट टळले. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे शिक्रापूरसह शिरूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शिक्रापूरमधील चाकण चौक परिसरात घडली. एक व्यक्ती तीन वर्षांच्या बालिकेसह अत्यंत मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या […]

अधिक वाचा..

घोड धरणात 82 टक्के पाणीसाठा, उजव्या आणि डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 82 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या उजव्या कालव्यातुन 150 क्युसेस आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती शाखा अभियंता वैभव काळे यांनी दिली. चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता ७६३८ दशलक्ष घनफुट असुन उपयुक्त […]

अधिक वाचा..

RTI चा गैरवापर करून ७० लाखांच्या खंडणीचा प्रयत्न; शैक्षणिक संस्थेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा

शिरूर (अरुणकुमार मोटे): माहितीच्या अधिकाराचा (RTI) कथित गैरवापर, खोट्या तक्रारी, ई-मेलद्वारे बदनामी आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थेची प्रतिमा मलिन करण्याची धमकी देत ७० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शरद वसंतराव फराटे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष यशवंत आडसूळ (रा. बोरी […]

अधिक वाचा..

केंदूरमध्ये पानातून दिली जाणारी संशयित अपायकारक पावडर जप्त; एकाला अटक

पाबळ (सुनील जिते): पानामध्ये मिसळून व्यसनासाठी वापरली जाणारी संशयित अपायकारक पावडर जप्त करत शिक्रापूर पोलिसांनी केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडमळा परिसरात धडक कारवाई केली. या प्रकरणी तुषार राहुल पऱ्हाड (वय २६, रा. पऱ्हाडमळा, केंदूर) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस […]

अधिक वाचा..
shikrapur-malthan-road

शिक्रापूर-मलठण रस्ता झाला चिखलमय; ठेकेदार कुठंय…

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर, ता. ११ जुलै २०२६ : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत www.shirurtaluka.comने आवाज उठवत सातत्याने बातम्यांची मालिका सुरू ठेवली आहे. शिक्रापूर-मलठण रस्त्याची सध्याची अवस्था अतिषय बिकट झाली असून, चिखलामुळे वाहने चालवणे आवघड झाले आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून, ठेकेदार नेमका कुठे आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शिक्रापूर ते […]

अधिक वाचा..

इनामगावात जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; एकाच कुटुंबातील चौघे जखमी; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): इनामगाव येथे पुर्वीच्या कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चार जणांना लाकडी दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवार दि १० जुलै २०२६ रोजी सकाळी 9:15 च्या सुमारास इनामगाव येथील श्रीकांत ट्रॅक्टर्स गॅरेजसमोर घडली. याबाबत रामदास पाटीलबुआ मचाले […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये गट सचिवांचा स्नेहमेळावा; सेवानिवृत्तांचा गौरव

शिरूर (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील गट सचिवांची बैठक, स्नेहभोजन व सेवानिवृत्त गट सचिवांचा सत्कार समारंभ नुकताच गुरुकृपा हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला तालुक्यातील गट सचिव, सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे उपनिबंधक मा. अरुणरावजी साकोरे होते. यावेळी सेवानिवृत्त गट सचिव दिगंबर लोणकर, महादेव थोरात, संभाजी दोंडे […]

अधिक वाचा..

दादागिरी, खंडणी आणि धमक्यांना शून्य सहनशीलता; तक्रार करा, कठोर कारवाई करू – पीआय चंद्रशेखर यादव

शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): व्यापाऱ्यांना सुरक्षित, भयमुक्त आणि कायद्याचे संरक्षण असलेले वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी (दि. ८) व्यापारी असोसिएशन व विविध व्यावसायिकांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन पोलिसांनी […]

अधिक वाचा..