शिरुर शहर व परिसरात दरोडा टाकून धुमाकूळ घालणारी टोळी गजाआड

दोन आरोपी अटकेत, पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी रांजणगाव गणपती (तेजस फडके) मागील दोन महिन्यांपासून रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत दरोडा टाकून धुमाकुळ घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ऐवज जप्त केला असून ४ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आदेश लालकुश […]

अधिक वाचा..

चुकीच्या विजबिलांमुळे ग्राहक त्रस्त; नियमितपणे रीडिंग आकारणी करण्याची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): राज्यात विजेच्या प्रश्नासंदर्भात अनेक घडामोडी घडत असताना ग्राहकांचे चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेत अथवा अंदाजे केली जाणारी रिडिंग व अवाजवी बिलांची आकारणी महावितरणकडून होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटी पद्धतीने विजेच्या मीटरचे रिडिंग आकारणी करण्यासाठी अनेक कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. मात्र प्रत्यक्षदर्शी जाऊन रिडिंग न […]

अधिक वाचा..

शिक्रापूर सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

शेतकऱ्याचा रस्ता तहसीलदारांचे आदेश डावलून अडवला  शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्याच्या शेताचा रस्ता तहसीलदारांचे आदेश डावलून जेसीबीच्या सहाय्याने खोदून अडवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिक्रापूर सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय रावसाहेब मांढरे व बाळासाहेब आण्णासाहेब मांढरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील नितीन खेडकर यांनी […]

अधिक वाचा..

मुरुम वाहतुक करणाऱ्या हायवा ट्रकने तलाठ्याला जोरदार धडक देवून केला जीवे मारण्याचा प्रयत्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारवाई करणाऱ्यासाठी गेलेल्या एका तलाठ्याच्या कारला मुरुम वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या चालकाने जोरदार धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात तलाठयाच्या गाडीने तीन पलट्या घेतल्या असून एअरबॅग ओपन झाल्याने जबर मार लागून तलाठी मात्र मोठया संकटातून […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात आझाद समाज पार्टीच्या अध्यक्षावर दगडफेक

एका वकीलासह दोघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आझाद समाज पार्टीच्या शिरुर तालुका महिला अध्यक्षाला शिवीगाळ दमदाटी करत त्यांच्यावर दगडफेक करुन जीवे मारण्याची धमकी देत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ॲड. केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे व खंडेराव शितोळे या तिघांवर ॲट्रॉसिटी सह […]

अधिक वाचा..

मकर संक्रांतीचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा होणार

शिक्रापूर (शेरखान शेख): आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने राज्य शासनाने मकर संक्रांती अर्थात भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असून या दिवशी कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे तसेच सर्व शासकीय विभागांनीही उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२३ हे नवीन वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय […]

अधिक वाचा..

बेल्हा- जेजूरी रोडवर पिंपरखेड गावच्या हद्दीत अपघातात तरुण युवकाचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील अविनाश गावशेते (वय २२) हा आई -बापाला एकुलता एक असणाऱ्या तरुणाचा बेल्हा- जेजुरी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुंटुबासह पिंपरखेड गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ११) रोजी रात्री ०८ :१५ वा […]

अधिक वाचा..

शिरुर पंचायत समिती रस्त्यावर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघातात एका महीलेचा मृत्यू,

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या आवारात जाण्या-येण्यासाठी मुख्य रस्ता ते दत्त मंदीर या रस्त्याचे सिमेंट कॉक्रेटचे काम चालू असुन हे काम सुरु असताना नागरीकांना जाण्या-येण्यासाठी कोणताही प्रतिबंध व उपाययोजना ठेकेदाराने केल्या नसल्याने याच रस्त्यावरुन शारदा गायकवाड ही महिला (दि 8) रोजी सकाळी 10:30 च्या दरम्यान पायी जात असताना भरधाव वेगाने रिव्हर्स गियर टाकून सिमेंट […]

अधिक वाचा..
grampanchayat

ग्रामपंचायत बांधायला दिड कोटी आहेत पण चौकाच्या नामांतरासाठी दिड लाख नाहीत का…?

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतच्या नुतन इमारत उदघाटन कार्यक्रमावर माजी उपसरपंचासह अनेकांचा बहिष्कार शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती येथील दिड कोटी खर्चून बांधलेल्या नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार (दि 13) रोजी सकाळी 11 वाजता होणार असुन या कार्यक्रमावर सत्ताधारी गटातीलच माजी उपसरपंच […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील करडे येथे बाळराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातून एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील शेवगा शेतीचे यशस्वी उद्योजक बाळाराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातुन शेतकऱ्यांसाठी (दि 16) जानेवारी रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाळाराजे ठेमेकर यांनी केले आहे. या शिबिरात देशी गाईच्या शेण गोमुत्रावर तयार होणाऱ्या […]

अधिक वाचा..