शिरुर तालुक्यातील करडे येथे बाळराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातून एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील शेवगा शेतीचे यशस्वी उद्योजक बाळाराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातुन शेतकऱ्यांसाठी (दि 16) जानेवारी रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाळाराजे ठेमेकर यांनी केले आहे. या शिबिरात देशी गाईच्या शेण गोमुत्रावर तयार होणाऱ्या बायोगॅसच्या साह्याने शेतमाल तयार करून महिला बचत गट आणि ॲपच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर बोडके यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

तसेच कमीत कमी भांडवलात शेळी पालन कसे करावे तसेच उत्तम नियोजन करुन हा व्यवसाय यशस्वी कसा करावा शेळी पालन साठी योग्य जात, शेळीला लागणारं खाद्य आणि पाणी, शेळीचे लसीकरण यावर सतीश रन्हेर हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतीत आर्थिक स्थिरता येण्यासाठी गावरान कोंबडीचे चिकन आणि गावरान अंडी यांचा व्यवसाय कसा करावा यावर युवा उद्योजक सौरभ तापकीर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शेवगा पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी औषधी पावडर पर्यंत सर्व प्रकारच्या उत्पादनाचे संपुर्ण मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शेवगा शेतीतील यशस्वी शेतकरी बाळराजे ठेमेकर हे देणार आहेत.

या भव्य प्रशिक्षण शिबिरात सेंद्रिय शेती, शेवगा शेती, शेळीपालन, गावरान कोंबडी पालन आणि अंडी विक्री तसेच त्याचे व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असुन या प्रशिक्षणाचे शुल्क 700 रुपये आहे. शिरुर तालुक्यातील करडे येथील बाळराजे कृषी उद्योग या ठिकाणी हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असुन यामध्ये सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा.

बाळराजे ठेमेकर 7350280522

महेंद्र खेरणार 9923937058