Video : शिरुर तालुक्यात ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

शिंदोडी (तेजस फडके) करडे गावातुन निमोणेकडे दुचाकीवरुन निघालेल्या ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीला लंघेवाडी येथे दुपारच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक बसली. त्यानंतर ट्रॅक्टर थेट अंगावरुनचं गेल्याने कैलास मारुती गायकवाड (वय ६०, रा. निमोणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) […]

अधिक वाचा..

पुणे बार असोसिएशन निवडणुकिसाठी अ‍ॅड अंजली बांदल ‘खजिनदार’ पदासाठी रिंगणात

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे नगरीतील विधी क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘पुणे बार असोसिएशन’ निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सन २०२६-२७ च्या या अटीतटीच्या निवडणुकीत, आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा ठसा उमटवणाऱ्या अ‍ॅड. अंजली शरद बांदल यांनी आज, 6 जानेवारी रोजी ‘खजिनदार’ पदासाठी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. विद्येच्या अंगणात सुवर्णअक्षरांनी कोरलेले यश अ‍ॅड. अंजली बांदल […]

अधिक वाचा..

कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता काम केल्याने अधिकाऱ्यांवर माफी मागण्याची नामुष्की

सरदवाडी ग्रामस्थांच्या लढ्याला मोठे यश; अनिल जाधव यांचे प्रतिज्ञापत्र चुकीचे ठरले शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थ रामदास सरोदे व इतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व एमआयडीसी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे झालेल्या सुनावणीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता […]

अधिक वाचा..
Jyoti-Mansing-Pachundkar

ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना प्रचारात पतीची खंबीर साथ!

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव–कारेगाव गटात राजकीय हालचालींना वेग आला असताना उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना पती मानसिंग पाचुंदकर यांची खंबीर साथ लाभत आहे. शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मानसिंग पाचुंदकर हे पत्नीच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रचाराला अधिक बळ मिळत आहे. शिरूर-आंबेगाव मतदार संघामधील गावांमध्ये […]

अधिक वाचा..

त्रिशंकू कौल दिल्यानंतर शिरूर नगर परिषदेत सत्तास्थापनेसाठी हालचाल

उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय खेळी रंगात; नेत्यांसोबत गुप्त बैठका, विजयी नगरसेवकांकडून पदांसाठी फिल्डिंग सुरू शिरूर (अरुणकुमार मोटे): बहुचर्चित शिरूर नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यानंतर प्रत्येक पक्ष व प्रत्येक नगरसेवकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून, आता सत्तास्थापना, उपनगराध्यक्षपद निवड तसेच विविध विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना जोर आला आहे. विविध पक्षांचे नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त […]

अधिक वाचा..

जाधवांना मुहूर्त सापडेना, शिरूरचा रस्ता मात्र सावरेना!

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर–मलठण या अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या मार्गावरील शेकडो खड्डे मागील अनेक दिवसांपासून वाहनचालक व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ आश्वासनांची पेरणी सुरू असून प्रत्यक्षात मात्र अर्धवट काम करून संपुर्ण दुरुस्तीचा मुहूर्त काही केल्या लागत नसल्याची स्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

गुनाटच्या दत्तभुमीतुन भक्तीचा जागर; दत्त परिक्रमेस ऐतिहासिक प्रारंभ

शिंदोडी (तेजस फडके): गेल्या अनेक दशकांपासुन भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावातुन दत्तभक्तीचा नवा अध्याय सुरु झाला असुन, येथील ग्रामदैवत श्री दत्त मंदिरातून दत्त परिक्रमेस भक्तिभावपूर्ण आणि मंगल वातावरणात ऐतिहासिक सुरुवात करण्यात आली. गुनाट येथील श्री दत्त मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, २०१८ साली ग्रामस्थांच्या एकजुटीतून मंदिराचा जिर्णोद्धार […]

अधिक वाचा..

Video : रांजणगावमध्ये नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक; ६० तरुणांची सुटका, दोघे ताब्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत दुबईतील नामांकित कंपनी आली असुन त्या कंपनीत नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर करत प्रत्येकी १० हजार रुपये उकळत तब्बल ६० तरुणांना डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या फसवणूक झालेल्यांमध्ये ४३ तरुण व […]

अधिक वाचा..

आश्वासनांची पुनरावृत्ती! रस्ते दुरुस्ती अर्धवट, शिरूर बांधकाम उपविभागाविरोधात नागरिकांचा संताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर सार्वजनिक बांधकाम उपविभागा अंतर्गत शिरूर – मलठण महामार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होत असून प्रत्यक्ष कामे अर्धवट व शास्त्रीय पद्धतीने व दर्जेदार होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खराब झालेल्या MPM रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, मागणीप्रमाणे कारपेटचे काम करण्यात येईल तसेच आनंद सोसायटी ते […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभार जि.प. शाळेचे माजी विद्यार्थी ३२ वर्षांनी शिवनेरीवर; गुरुजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १९९५ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३२ वर्षांनंतर ऐतिहासिक शिवनेरी गडावर अत्यंत भावनिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. बालपणी एकाच वर्गात शिकलेले विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तर त्या आठवणी घडविणाऱ्या गुरुजनांचा सत्कार हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. या वेळी […]

अधिक वाचा..