शिरुरमध्ये आढळली पावाच्या लादीत घुशीची लेंडी ; नागरिकांमध्ये संतापाची लाट

अन्न प्रशासन विभाग दाखवा आणि बक्षीस मिळवा असे म्हणण्याची नागरिकांवर वेळ… शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर शहरालगत रामलिंग रोडवर असणाऱ्या सिरवी बंधू मिठाईवाले या स्वीटहोम बेकरीतून विकत घेतलेल्या पावामध्ये चक्क घुशीची लेंडी आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० जुलै रोजी सतीष तागड यांच्या बाबतीत घडली. त्यांनी दोन पावाच्या लाद्या विकत घेतल्या असता त्यामध्ये एका […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ‘या’ गावात आढळला अज्ञात मृतदेह

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभूळसर खुर्द येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. करडे-बाभुळसर अष्टविनायक महामार्गालगत डाळिंबकर मळा परिसरात एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार या व्यक्तीच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात; भाजीपाल्याच्या घसरलेल्या दरांचा मोठा फटका

रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) सध्या भाजीपाल्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून त्याचा थेट परिणाम शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर झाला आहे. विशेषतः टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पालक, पालेभाज्या यांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा परवडेनासा झाला आहे. शेतीसाठी लागणारी औषधे, बी-बियाणे, मजुरी, पाणी आणि वाहतूक खर्च यामुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत होते. आता […]

अधिक वाचा..

शिक्रापूर-न्हावरे राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे संकट

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते न्हावरे (NH548D) दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना अक्षरशः धुळीच्या वावटळीतून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अलिकडच्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने रस्त्याच्या मुरूमाच्या दबाईसाठी पाण्याचा वापर होत नसल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड […]

अधिक वाचा..

शिक्षक बदल्यांतील गैरप्रकार उघड शिरूर तालुक्यात खोट्या वैद्यकीय दाखल्यांवरून सावळा गोंधळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यात शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून, पुणे जिल्हा परिषदेकडूनही तालुकाअंतर्गत व तालुकाबाह्य बदल्यांची प्रक्रिया वेगात सुरू आहे. मात्र, शिरूर तालुक्यात या बदल्यांमध्ये गंभीर अनियमितता आणि गैरप्रकार समोर येत असून, खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्या करून घेतल्याचा आरोप काही शिक्षकांवर झाला आहे. यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांमध्ये […]

अधिक वाचा..

Video; शिक्रापुर येथे टेम्पो आणि अज्ञात वाहनाची जोरदार धडक; चालक फरार

शिक्रापुर (अर्जुन शेळके) शिक्रापुर (ता. शिरुर) पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील मलठण फाट्याजवळ टेम्पो आणि अज्ञात वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु टेम्पो चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला आहे. या दोन वाहनांच्या धडकेनंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिक्रापुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतुक सुरळीत केली. तसेच क्रेनच्या मदतीने […]

अधिक वाचा..

Video; राजगड तालुक्यात विचित्र घटना ११ ट्रॅक्टर अडकले चिखलात

राजगड (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरातील करंजवणे गावात भात लागवडीदरम्यान एक अनोखी आणि थोडीशी गंमतीशीर घटना घडली आहे. एका ट्रॅक्टरच्या चिखलात अडकण्याने सुरु झालेला प्रकार एकामागोमाग तब्बल ११ ट्रॅक्टर अडकल्याने शेतात काम ठप्प झाले. स्थानिक शेतकरी भात लागवडीसाठी शेतात गेले होते. मात्र, शेतात चिखल खुप खोल असल्याचा अंदाज न आल्याने एक ट्रॅक्टर चिखलात खोलवर अडकला. […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यातील शांताई डेअरी मध्ये शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्याचा आरोप

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरातील शांताई डेरी व पशुखाद्य येथे मोठ्या प्रमाणात   शेतकऱ्यांची फसवणुक आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ‘अन्याय तेथे प्रतिकार’ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर संस्थेच्या संस्थापक/अध्यक्षा स्वाती गायकवाड, कार्याध्यक्षा संगिता वानखेडे, सचिव अर्चना केदारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असुन संबंधित […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भरधाव मोटारसायकलची धडकेत महिला गंभीर जखमी, चालक फरार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावच्या हद्दीत सावी हॉटेलसमोर रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलांवर काळ्या रंगाच्या भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२५ रोजी रात्री ०९:४५ वाजता सदरवाडी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांनी चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन चोरांना रंगेहाथ पकडले

शिक्रापुर (अर्जुन शेळके): शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शिक्रापुर येथील करंजेनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर, दोन चोर पुन्हा चोरी करण्याच्या तयारीत असताना हवालदार विकास पाटील व राम जाधव यांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान ही कारवाई करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दोघांपैकी एकाचे नाव शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोगा, […]

अधिक वाचा..