भीमा नदीच्या पुराचा फटका; आरणगाव वडगाव बांडे बंधाऱ्यावरुन वाहतूक ठप्प…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

न्हावरे (अक्षय टेमगिरे) सततच्या पावसामुळे भीमा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका आरणगाव-वडगाव बांडे बंधाऱ्याला बसला आहे. या बंधाऱ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने बाजूच्या फॉरेस्ट हद्दीतील भराव वाहून गेला असून बंधाऱ्यावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

 

यामुळे दूध व्यवसायिक, शाळकरी मुले तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन ये-जा बंद झाल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.सदर ठिकाणी पाटबंधारे विभाग, वन विभाग व महसूल विभाग यांनी पाहणी करून पंचनामा केला असला तरी प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.

 

ग्रामस्थांच्या वतीने संतोष लेंडे पाटील, राजेंद्र मखर, संतोष भालेराव, गणेश मखर, संतोष जाधव, सुभाष ओझरकर, हनुमंत कोकाटे, सुनील जाधव, कृष्णाजी कोकाटे आदींनी प्रशासनाला तातडीने भराव भरुन रस्ता सुरु करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

रांजणगाव MIDC उत्खनन प्रकरण; शिरुरच्या तहसीलदारांनी तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप…?

रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन ;पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले