शिरूरमध्ये मोठा गुटखा साठा उघड; १.१६ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त

शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई, आरोपीला अटक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील पुणे-अहिल्यानगर बायपासजवळील जिओ पेट्रोल पंपासमोरील परिसरात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ लाख १६ हजार ५४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी हिमांशु धर्मवीर सिंग (वय २३, रा. पुणे रोड, अहिल्यानगर) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच पारदर्शक बदल्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची क्रांतिकारी कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यात महसूल प्रशासनात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आलं असून, पहिल्यांदाच तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या पारदर्शक बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या बदल्यांमध्ये एक रुपयाही लाच किंवा राजकीय दबाव न घेताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. त्यामुळे प्रशासनात प्रामाणिकपणाला चालना मिळाली असून, […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

कारेगाव (तेजस फडके) ढोकसांगवी शिवारातील गट नंबर ५०१ मधील विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ऋषीकेश काळुराम मलगुंडे (वय २८) रा. मलगुंडे वस्ती, ढोक सांगवी) यांनी रांजणगाव MIDC पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. ऋषीकेश मलगुंडे हे आज (दि ८) रोजी सकाळी विहिरीवर पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेले असताना […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्यासह कार्यकर्त्यांचे सामुहिक मुंडण

शिरुर (तेजस फडके) राज्य महामार्ग क्रमांक १०३ वरील आमदाबाद ते मलठण रस्त्यावरील व कोंढाण ओढा पुलावरील निकृष्ट कामांबाबत निषेध व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी सुरु केलेल्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनाला आज रविवार (दि ८) रोजी आठ दिवस पूर्ण झाले. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ वाळूंज व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरुर तहसिल कार्यालयाच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव तिहेरी हत्याकांड; लव्ह, सेक्स आणि धोका…?

शिरुर (तेजस फडके) रांजणगाव पोलिस MIDC स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गालगत, बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला काही अंतरावर एक महिला, दोन लहान मुले असे एकूण तीन मृतदेह दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान आढळून आले होते. सदरचे अनोळखी मृतदेह हे अर्धवट जळालेले होते. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात कडवळ तोडण्याच्या वादातून एका महिलेसह तिच्या पती व नातलगावर लोखंडी गज व लाकडी काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून सात आरोपींविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी साधना शंकर देशमुख (वय ३६) रा. न्हावरे, ता. शिरुर, जि. […]

अधिक वाचा..

शिरुर मधील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या दोन नेमबाजांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

शिरुर (तेजस फडके) मुंबई येथे ५ ते ९ जून दरम्यान पार पडलेल्या कॅ. येस. जे. इझेकीयल राज्यस्तरीय १० मीटर पीप साईट एअर रायफल शूटिंग स्पर्धा ही अत्यंत चुरशीची ठरली. या स्पर्धेत शिरुरच्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या दोन नेमबाजांनी आपली चमकदार कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या संदेश दत्तात्रय भोंडवे तसेच […]

अधिक वाचा..

शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर-वाघाळे-मलठण या प्रमुख दळणवळणाचा मार्ग असलेल्या रस्तावर प्रचंड मोठया प्रमाणात खड्डे पडले असुन रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ता आहे. हे समजणे कठीण झाले आहे. हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला असुन या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे एका व्यक्तीवर दोन भावांनी मिळून तलवार व दगडाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला असुन या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजीत नंदू बत्ते (वय २९) रा. राजमुद्रा हॉटेल पाठीमागे, रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून तिघांकडून हल्ला; गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे गाडी रस्त्यावर उभी केल्याच्या किरकोळ कारणावरुन तिघांनी मिळून दोन भावांवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असुन यामध्ये एका भावाच्या डोक्याला गंभीर मार लागला असुन दुसऱ्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत […]

अधिक वाचा..