१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे विद्यार्थी सहाय्यता आणि समन्वय कक्ष’ तसेच ‘मिशन खाकी – पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान’ सुरू करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते […]

अधिक वाचा..

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तळागाळातून उभे राहिलेल्या नेतृत्वाला विशेष स्थान राहिले आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून राजकारणाची सुरुवात करून जनतेशी थेट संपर्क, संघटनात्मक काम आणि विविध राजकीय जबाबदाऱ्या पार पाडत राज्याच्या सत्ताकेंद्रापर्यंत पोहोचलेले एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा अध्याय मानला […]

अधिक वाचा..

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षांतील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री […]

अधिक वाचा..

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून काम करत असल्याने राजकीय स्वार्थापोटी आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी महापौर तथा शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केला. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..
grampanchayat

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी माजी सरपंच आणि युवकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर माजी सरपंचाने युवकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी माजी सरपंचासह तिघांविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. जारगाव ग्रामपंचायतीची […]

अधिक वाचा..

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली तरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमार काम करत असून लोकशाही आणि संविधान संपवण्याचे पाप केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. राहुल […]

अधिक वाचा..

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा 

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी असल्याचे सांगत ती आणखी दोन महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना पत्र पाठवले आहे. सपकाळ यांनी पत्रात […]

अधिक वाचा..

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चे काढण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ज्ञानेशकुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. अमरावती येथे ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली, […]

अधिक वाचा..

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक होत आदरांजली वाहिली. यावेळी मनात साठलेल्या भावना त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे व्यक्त केल्या. “आठ महिने झाले… […]

अधिक वाचा..