राज्यातील शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे किडन्या विकल्या प्रकरणी आरोपींना मकोका लावावा; विजय वडेट्टीवार

मुंबई: महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीवर विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारला धारेवर धरले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून राज्यात सावकारांचे राज्य सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या […]

अधिक वाचा..

सिमरिया जंगलात एअर ॲम्बुलन्सचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, दोन मुले अनाथ

झारखंड: झारखंड राज्याला हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाला दिल्लीला हलवण्यासाठी निघालेली एअर ॲम्बुलन्स सिमरिता येथील घनदाट जंगलात कोसळली. या भीषण दुर्घटनेत विमानातील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ चतराच नव्हे तर संपूर्ण झारखंड शोकसागरात बुडाले आहे. स्वतःच्या ढाब्यातील आगीत गंभीर भाजले होते संजय कुमार लाटेहार डिस्ट्रिक्ट […]

अधिक वाचा..

तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आसाम: आसाममधील कछार जिल्ह्यातील सिल्चर शहरात २८ वर्षीय तरुणीवर तब्बल सात जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपींनी पीडिता आणि तिच्या प्रियकराकडून बळजबरीने पैसेही उकळल्याचा आरोप आहे. १९ फेब्रुवारीची घटना मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पीडिता तिच्या प्रियकरासोबत कारमधून फिरायला गेली असताना, सिलचर शहरापासून काही किलोमीटर […]

अधिक वाचा..

अजित दादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापले; सुप्रिया सुळेंचा तो सवाल; सखोल चौकशीची मागणी

बारामती: राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हा अपघात नसून व्यापक कट आणि घातपात असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच व्हीएसआर (VSR) कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणावर रोहित पवार यांनी आतापर्यंत तीन पत्रकार […]

अधिक वाचा..

राजे यशवंतराव होळकर निवासी शाळांवरून बहुजन कल्याण विभागात वाद; सचिवांचा आदेश धाब्यावर?

मुंबई: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुजन कल्याण विकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना संदर्भात मोठा प्रशासकीय वाद निर्माण झाला आहे. सचिवांनी २५ निवासी शाळांची मान्यता नाकारत कठोर आदेश दिल्यानंतरही विभागाच्या संचालकांकडून पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २५ शाळांवर निधी […]

अधिक वाचा..

केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून निधी द्यावा: विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (रोहयो) वाटोळे झाले आहे. थकीत निधीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३ लाख १२ हजार कामे बंद पडली असून मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही,असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मजुरांची संख्या […]

अधिक वाचा..

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर नाही; विजय वडेट्टीवार 

मुंबई: राज्यातील घरकुल योजनेत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर मिळाले नसल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली. “तीन पावसाळे उलटले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी […]

अधिक वाचा..

भाजपमध्ये मोठे फेरबदल! केशव उपाध्ये उपाध्यक्षपदी, नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद

मुंबई: महाराष्ट्रातील निवडणुकांची रणधुमाळी ओसरताच भारतीय जनता पक्षने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. नव्या कार्यकारिणीत काही जुन्या चेहऱ्यांना नवी जबाबदारी देत तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून पक्षाची भूमिका आक्रमक आणि अभ्यासू पद्धतीने मांडणारे केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्तेपदावरून प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवनाथ बन […]

अधिक वाचा..

१६ मार्चला राज्यसभा रणधुमाळी; महाराष्ट्रातील ७ जागांसाठी महायुती-महाविकास आमनेसामने

मुंबई: भारत निवडणूक आयोग यांनी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रातील सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाणार आहे.महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी […]

अधिक वाचा..

कथित फसवणूक प्रकरणात अनिल अंबानी यांना मोठा झटका; मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

मुंबई: रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्यांना ‘फ्रॉड’ म्हणून वर्गीकृत करण्याच्या कारवाईवर मिळालेला दिलासा अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकलपीठाने दिलेला स्थगिती आदेश रद्द करत बँकांची अपील मंजूर केली. त्यामुळे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यांनी एकलपीठाच्या आदेशाला आव्हान […]

अधिक वाचा..