माणुसकीला काळिमा! पतीवरच्या रागातून आईकडून दीड वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या

लातूर: लातूर शहरातील श्यामनगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पती घरी उशिरा परतल्याच्या रागातून एका आईने आपल्या दीड वर्षांच्या चिमुरडीची निर्दयीपणे हत्या केल्याने संपूर्ण लातूर शहर हादरले आहे. अश्विनी चौगुले (वय अंदाजे २५) असे आरोपी महिलेचे नाव असून, तिने नंदिनी नावाच्या आपल्या १८ महिन्यांच्या मुलीवर चाकूने सपासप वार करत तिचा जीव घेतला. […]

अधिक वाचा..

उमेदरीवरून राजकीय उलथापालथ! काळे गटाचा भाजमध्ये प्रवेश; भाजप–राष्ट्रवादी थेट आमनेसामने

पंढरपूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, समाधान काळे व गणेश पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवारीवरून राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना वाखरी तर गणेश पाटील […]

अधिक वाचा..

गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमधील फरक काय?

माघी गणेशोत्सवाचे महत्त्व, पूजा नियम आणि 2026चा शुभ मुहूर्त मुंबई: भारतीय संस्कृतीत भगवान गणेशाला प्रथमेश मानले जाते. कोणतेही शुभ कार्य गणपती पूजनाशिवाय पूर्ण मानले जात नाही. वर्षातून दोन वेळा गणरायाचा मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा केला जातो. एक म्हणजे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि दुसरा म्हणजे माघ महिन्यातील गणेश जयंती. मात्र अनेकदा या दोन्ही सणांमध्ये नेमका […]

अधिक वाचा..

मुख्याध्यापकांसह शिक्षकांसाठीही ‘टीईटी’ बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्षण विभागाची स्पष्टता सोलापूर: इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, हा निर्णय केवळ शिक्षकांसाठी असून मुख्याध्यापकांना लागू नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडत मुख्याध्यापकांनाही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे […]

अधिक वाचा..

केज शहरात अतिक्रमणांवर मोठी कारवाई; प्रशासन ऍक्शन मोडवर

केज: केज शहरातील रस्त्यांवर शासकीय जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ऍक्शन मोडवर आले आहे. यासंदर्भात काल वरिष्ठ पातळीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, केज शहरातील विविध भागांमध्ये शासकीय जागेवर झालेले सर्वच अतिक्रमण सरसकट हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची […]

अधिक वाचा..

कोल्हापूर जिल्ह्यातील २०,३१० रेशनधारकांचे धान्य बंद

शासकीय कर्मचारी, मृत लाभार्थी व सहा महिने धान्य न घेणाऱ्यांचा समावेश कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २० हजार ३१० रेशनधारकांना आता रेशनचे धान्य मिळणार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून धान्य न घेणारे, शासकीय सेवेत असलेले तसेच मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेल्या शिधापत्रिकांचा या कारवाईत समावेश आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्ह्यातील मोठ्या वर्गाला अन्नसुरक्षाअंतर्गत धान्य दिले जाते. यामध्ये […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! e-KYC मधील चुका दुरुस्त होणार; अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन e-KYC प्रक्रियेमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. जानेवारी महिन्यात अनेक पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती देत, […]

अधिक वाचा..

चित्रनगरीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी गिरवले व्यवस्थापनाचे धडे

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि सल्लागाराकरिता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथे ही दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. प्रकल्प व्यवस्थापन, आर्थिक नियोजन व बजेटिंग, कार्य–जीवन संतुलन, कार्यस्थळी तंत्रज्ञान, अपग्रेडेशन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत केतन गावंड यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवसाचा समारोप `टीम बाँडिंग’साठी अनौपचारिक `कराओके’ सत्राने […]

अधिक वाचा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर

मणिकर्णिका घाटावरील तोडफोडीची करणार पाहणी मुंबई: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पवित्र मणिकर्णिका घाटाची बुलडोझरद्वारे तोडफोड केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या कारवाईत घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंग उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

प्रयागराजमध्ये माघ मेळ्यावरून वाद पेटला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस, आंदोलन तीव्र

प्रयागराज: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यातील मतभेद आता थेट आंदोलन आणि कायदेशीर नोटीशीपर्यंत पोहोचले आहेत. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नानस्थळी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. या निर्णयाचा तीव्र निषेध करत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी […]

अधिक वाचा..