शैक्षणिक सहलीसाठी ‘एसटी’कडून ५० टक्के सवलत; तर शाळांसाठी हे आहे नियम व अटी? 

अहमदनगर: शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहता याव्यात व त्याची माहिती मिळावी म्हणून दरवर्षी शैक्षणिक सहलीला मान्यता देण्यात आली आहे. पण, सहलीसाठी विद्यार्थ्यांना सक्ती नको आणि सहलीसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांची संमती बंधनकारक असेल, असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे. […]

अधिक वाचा..

आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावावे लागणार; अजित पवारांनी दिली महत्वाची माहित…

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. त्यांनी अदिती तटकरे यांनी आणलेल्या चौथ्या महिला धोरणाची माहिती दिली. महिला मंत्री असल्यामुळे त्यातील बारकावे अदिती यांना माहित असल्याचे पवार म्हणाले. तसेच या धोरणातील काही माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी नावात केलेला मोठा बदल सांगितला आहे. यापुढे अजित अनंतराव पवार असं नाव […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; दुमजली उड्डाणपूलासह…

पुणे : पुणे-नगर आणि पुणे-नाशिक या दोन महामार्गांवरील कोंडी दूर करण्यासाठी या महामार्गांच्या विस्तारासह येथे उन्नत मार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निर्णय घेतला आहे. पुणे-शिरूर दरम्यानचा सहापदरी महामार्ग आणि त्यावर सहा पदरी उड्डाणपूल; तसेच नाशिक फाटा ते खेड दरम्यान दोन पदरी सेवा रस्त्यांसह आठ पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही […]

अधिक वाचा..

आदिवासी शेतकरी,कष्टकरी बांधवांच्या बिर्‍हाड मोर्चातील प्रश्‍नांचा थेट विधानसभेत एल्गार

नागपूर: धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी,कष्टकर्‍याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पुकारला. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा बिर्‍हाड मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच शासनाने मध्यस्थी करुन शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात […]

अधिक वाचा..

पोकरा योजनेतील भ्रष्टाचारात अधिकारी दोषी; अंबादास दानवे

नागपूर: शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असून एकाच योजनेतून दोनदा लाभ घेतला जातो. अकोला जिल्ह्यात या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारात अधिकारीही दोषी असून यावर कारवाईची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. शेततळे, फळबाग, कृषी लागवड, तुषार व ठिबक सिंचन आदीसाठी शेतकऱ्यांना पोखरा योजनेच्या माध्यमातून लाभ होत असतो. अकोला जिल्ह्यात […]

अधिक वाचा..

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना वीजबिलात माफी द्यावी; बाळासाहेब थोरात 

नागपूर: ग्रामीण भागात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिल आकारणी अभावी बंद झालेल्या आहेत, या योजनांना शासनाने वीजबिलात माफी किंवा सवलत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली. नागपूर हिवाळी अधिवेशनात बाळासाहेब थोरात यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा लावून धरला. थोरात म्हणाले, ‘राज्यात बहुतांश भागात दुष्काळाची परिस्थिती […]

अधिक वाचा..

मीरा भायंदरच्या जनतेची लुट करणाऱ्या इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीवर कारवाई करणार का? 

नागपूर: ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर येथील ८९९४ एकर जमीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २००८ रोजी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करण्यात आली असून या कंपनीचे ७/१२ उताऱ्यावर नावही आहे. येथील जमीन व्यवहार करताना जनतेला या कंपनीला पैसे द्यावे लागतात. सरकारी जमिनीवरून अशा पद्धतीने पैसे वसूल करण्याचा या कंपनीला अधिकार आहे का? याप्रकरणी सरकार चौकशी […]

अधिक वाचा..

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; अजित पवार

मुंबई: विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्रसरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आलेली आहे. कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पुढील दोन दिवसात दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी वैधानिक विकास मंडळाचे तातडीने पुनर्गठन करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही […]

अधिक वाचा..

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही; धनंजय मुंडे

नागपूर: केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतुन राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या […]

अधिक वाचा..

राज्यात अत्यंत भयावह परिस्थिती असताना सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर; नाना पटोले

नागपूर: भाजपाप्रणित सरकारने महाराष्ट्र पेटवला असून तो आधी शांत केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला […]

अधिक वाचा..