सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी: रमेश चेन्नीथला

मुंबई: २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे […]

अधिक वाचा..

मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या निधीत कपात तर अमली पदार्थांत वाढ; अनंत गाडगीळ

मुंबई: देशाला सर्वाधिक करनिधी देणाऱ्या महाराष्ट्राला मोदी सरकार सावत्र वागणूक देत असून महायुतीच्याच कालखण्डात महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत कपात तर अमली पदार्थात वाढ, अशी वस्तुस्तिथी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते मा आम. अनंतराव गाडगीळ यांनी केला आहे. राज्य निधी वाटप अंतर्गत उत्तर प्रदेशला जवळपास २५ हजार कोटी , बिहारला व आंध्र प्रदेशला प्रत्येकी सुमारे १४ […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण

मुंबई: राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आधारे आमचे सरकार आल्यास तुम्हाला 3000 रुपये देऊ अशी घोषणा केली. ही घोषणा म्हणजे लबाडाच्या घरचे जेवण आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया विधान परिषद उपसभापती नीलम ताई गोरे यांनी शायना एन सी. यांच्या […]

अधिक वाचा..

भाजपा शिंदे सरकारने मुंबई अदानीकडे गहाण ठेवली…

मुंबई: भाजपा शिंदे सरकारच्या काळात मुंबई व महाराष्ट्रात गुंडगिरी वाढली असून कुख्यात गुन्हेगार खुलेआमपणे फिरत आहेत. लॉरेन्स बिन्शोई साबरमतीच्या जेलमधून बॉलिवूडला धमक्या देत आहे. फेसबुक लाईव्हवर हत्या, पोलीस स्टेशनमध्ये खुलेआमपणे गोळीबार, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या अशा गंभीर घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर कुख्यात गुंडांचा वावर व मंत्रालयात गुंड रिल बनवत आहेत. […]

अधिक वाचा..

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी, सर्व बँका राहणार बंद, फक्त ‘या’ सेवा सुरू राहणार

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांना मतदान करण्यासाठी संधी मिळावी यासाठी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात येणार असून या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर संबंधित संस्थांव्यतिरिक्त बँकाही बंद राहतील. त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. मोबाईल आणि नेट बँकिंग सुविधा सुरू […]

अधिक वाचा..

दिल्ली ते गल्ली, भा.ज.प. ची सारी गळती सरकार; अनंत गाडगीळ    

मुंबई: पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या मुंबईतील कोस्टल रोडच्या भिंतीतून ४ महिन्यातच […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींच्या राजवटीत, शेतकरी, कामगार, महिला, तरूण सेफ नाहीत; प्रियंका गांधी 

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस […]

अधिक वाचा..

गुजरातला उद्योग हलवून महाराष्ट्रात रोजगार कसा देणार

मुंबई: मोदी सरकारने महाराष्ट्रातील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, मरीन अकादमी, बल्क ड्रग पार्क, डायमंड बोर्सपासून, फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रचंड रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्राकडून हिरावून गुजरातला नेले असता महायुतीने आपल्या जाहिरनाम्यात 25 लाख रोजगार देण्याचे आश्वासन कसे दिले आहे, असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे. महाराष्ट्राचा राज्य उत्पन्नाचा वाटा दोन […]

अधिक वाचा..

कांद्याच्या वाढत्या दराची मुख्यमंत्र्यांकडून दखल

साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश मुंबई: सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच पणन विभागाला दिले आहेत. मोठ्या आणि लहान व्यापाऱ्यांना त्यांनी किती कांदा साठवणूक करावी ती मर्यादा दिली निश्चित […]

अधिक वाचा..
school-teacher

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांनो, लागा अभ्यासाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा […]

अधिक वाचा..