‘मुंब्रा हिरवा करू’ वक्तव्यावरून राजकीय वाद! AIMIM नगरसेविका सहर शेख अडचणीत

मुंब्रा: ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नव्या नगरसेविका सहर शेख यांच्या विजय भाषणातील “पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करू” या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २२ वर्षीय सहर शेख यांनी निवडणूक विजयाच्या आनंदात […]

अधिक वाचा..

आज बाळासाहेब असते तर व्यथित झाले असते; राज ठाकरे

मुंबई: शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेणारी भाषणं झाली. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश […]

अधिक वाचा..

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणे आजही प्रेरणादायी

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात झाली असून, या निमित्ताने त्यांच्या प्रभावी आणि परखड भाषणांची पुन्हा एकदा आठवण करून दिली जात आहे. बाळासाहेबांची भाषणे आजही लाखो शिवसैनिक आणि मराठी माणसासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना, “बाळासाहेब म्हणजे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व […]

अधिक वाचा..

उमेदरीवरून राजकीय उलथापालथ! काळे गटाचा भाजमध्ये प्रवेश; भाजप–राष्ट्रवादी थेट आमनेसामने

पंढरपूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, समाधान काळे व गणेश पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवारीवरून राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना वाखरी तर गणेश पाटील […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरूर! राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारताच तृप्ती सरोदे यांनी हाती घेतले धनुष्यबाण…

शिरूर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात निवडणुकीच्या ऐन तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या आणि तळागाळात प्रभावीपणे काम करणाऱ्या तृप्ती सरोदे यांना पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारत अनपेक्षित धक्का दिला. या निर्णयाने संतप्त झालेल्या सरोदे यांनी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रवादीशी काडीमोड घेत एकनाथ शिंदेच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वाती पाचुंदकर पाटील , मनिषा पाचंगे आणि सागर देवकर यांनी भव्य आणि शिस्तबद्ध शक्तीप्रदर्शन करत सोमवार (दि १९) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण गटात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली […]

अधिक वाचा..

रांजणगाव-कारेगाव ZP गटात हजारो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन; तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवार (दि २०) रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली राजकीय ताकत दाखवत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ज्योती मानसिंग पाचुंदकर, निर्मला शुभम नवले आणि महेश फंड या तीनही अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीच्या […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

शिरूर! जिल्हा परिषद गट टाकळी हाजीत कोणता पक्ष ठरणार श्रेष्ठ …

शिरूर (नितीन थोरात) : जिल्हा परिषद गट टाकळी हाजी येथे राजकीय घडामोडींनी अचानक वेग घेतला असून, या गटातील उमेदवारांची चिंता वाढली आहे. कालपर्यंत संभाव्य पक्षचिन्हांची छाप मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांकडून झालेली धडपड, नव्या राजकीय समीकरणांमुळे व्यर्थ ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. टाकळीहाजी हे या गटातील सर्वाधिक मतदार असलेले गाव मानले जाते. याच गावातून जिल्हा परिषदेसाठी दोन […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर महायुतीत खळबळ! माझा पराभव जनतेने नाही, भाजपच्या गद्दारीने केला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा […]

अधिक वाचा..

महापौर निवडीवर भाजप–ठाकरे युतीचा नवा फॉर्म्युला; हेमंत पाटील 

मुंबई: मराठी आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला महापौर निवडीसाठी बाहेरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी स्पष्ट इच्छा व्यक्त केली […]

अधिक वाचा..