महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका! ‘पॅनेल पद्धती’बाबत मतदारांच्या सर्व शंका दूर

मुंबई: महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून गुरुवार, १५ जानेवारी रोजी राज्यभर मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सर्व राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदाच्या महापालिका निवडणुका ‘पॅनेल पद्धतीने’ होत असल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. […]

अधिक वाचा..

भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा

महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या कूनितीची फळं महाराष्ट्र भोगतोय… मुंबई: भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनितीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता […]

अधिक वाचा..

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजल

औरंगाबाद: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कोणत्या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशीव लातूर कोकण विभाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर निवडणूक वेळापत्रक खालीलप्रमाणे नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे: 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 अर्जांची छाननी: 22 जानेवारी 2026 […]

अधिक वाचा..

भाजपच्या भ्रष्ट, अपयशी कारभाराला जनता कंटाळली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या सांगता सभेतून भाजपवर काँग्रेसचे टीकास्त्र चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजपविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटले की, देशासह संपूर्ण राज्यात व महानगरपालिकेत भाजपने विकासाच्या नावाखाली फक्त लुटीचे राजकारण केले. रस्ते नाहीत, पाणी नाही, स्वच्छता नाही […]

अधिक वाचा..

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा

मुंबई: भारतीय जनता पक्ष व असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदु मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात. हिरव्या पतंगाचा मांजा भगवा आहे तर धनुष्याचा बाण हिरवा आहे. या ढोंगी भाजपा, शिंदेसेना व एमआयएमला महानगरपालिका निवडणुकीत धडा शिकवा व काँग्रेसला […]

अधिक वाचा..

पुणे महापालिका निवडणूक मतमोजणीसाठी जय्यत तयारी; अंतिम निकाल रात्री उशिरा येण्याची शक्यता

पुणे: पुणे महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अधिकृत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत बहुतांश प्रभागांचे निकाल जाहीर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला, तरी अंतिम प्रभागाचा निकाल रात्री १० वाजेपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील १५ मतमोजणी केंद्रांवर ३३५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, […]

अधिक वाचा..

पुणे महानगरपालिका निवडणूक; शिवसेनेचा प्रचार वेगात

डॉ. नीलम गोऱ्हेंकडून उमेदवारांच्या कचेऱ्यांना भेटी; मतदान दिनी विशेष काळजीचे आवाहन पुणे: पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिवसेनेने प्रचाराचा जोर वाढवला आहे. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी (दि. १२) पुण्याच्या मध्यवर्ती भागातील विविध प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या निवडणूक कचेऱ्यांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मतदान […]

अधिक वाचा..

जब चाहिए हरपत्ती तब याद आते है उद्योगपती

बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ अहंकार मोठा मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प, नवी मुंबई विमानतळाचे काम मुख्यमंत्री असताना अदानींना कोणी दिलं. हरपत्तीची गरज असल्यानेच त्यांना उद्योगपती आठवू लागलेत, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा व राज ठाकरेंवर केली. भाजप रिपाई महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय […]

अधिक वाचा..

ही सभा प्रचाराची नाही, विजयाची नांदी आहे

शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी १५ जानेवारीला मतदानाचे आवाहन मीरा भाईंदर: “मीरा भाईंदरवर बाळासाहेबांचे प्रेम होते. मुंबई भगवी आहे, ठाणे भगवे आहे आणि आता मीरा भाईंदरही भगवे होणारच,” असा ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जाहीर सभेत केला. “ही सभा प्रचाराची नाही, ही विजयाची नांदी आहे,” असे सांगत १५ जानेवारी […]

अधिक वाचा..

शिवसेना–भाजप–रिपाईला बहुमत द्या, महापालिकेवर भगवा फडकवा

मुंबईचा थांबलेला विकास पुन्हा सुरू; घर, रस्ते आणि योजनांवर शिंदेंचा ठाम भर मुंबई: विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला आहे. घरकुल योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, खड्डेमुक्त काँक्रीट रस्ते आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांच्या माध्यमातून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..