कोरेगाव भीमात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे कमलेश भोसले हा रात्रीच्या सुमारास जेवण करुन घरात झोपला होता. सकाळच्या सुमारास कमलेश दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या आई सह आदींनी खिडकीतून पाहिले असता कमलेश राजू भोसले (वय ३७) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत जितेंद्र विजय गाडेकर (वय […]

अधिक वाचा..

निमोणे येथे विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

निमोणे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून सुनिल शिवाजी थोरात (वय २८ वर्षे) रा. गुनाट (ता. शिरुर) जि. पुणे हा युवक मरण पावला असुन नक्की हा मृत्यू कशामुळे झाला हा घातपात आहे की अजुन काही याची चौकशी पोलिस करत आहेत. याबाबत बाप्पु शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा विजेच्या मागणीला महावितरणचा खोडा…

बिबटयाच्या सततच्या हल्ल्याने शेतकरी बेजार… शिरुर (अरुणकुमार मोटे): ओ साहेब… शेतीला दिवसा वीज देता का वीज… अशी आर्त हाक शेतकरी अनेक दिवसांपासून देत असून ही मागणी महावितरणकडून अद्याप पुर्ण होऊन शकल्याने रात्रीच्या वेळी अश्रू ढाळत जीव मुठीत धरून शेताला पाणी देण्यासाठी जात आहे. शिरुर तालुक्यात बिबट्याचे वाढते हल्ले, सर्पदंश आणि बदलते हवामान या अस्मानी संकटांचा […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मारहाण करत युवकाचा मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे रात्रीच्या सुमारास कामावरुन आलेल्या कामगाराला तिघांनी मारहाण करत त्याचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे कृष्णा पवार हा युवक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंपनीतून कामावरून परत आला. रस्त्यावर उभा राहून […]

अधिक वाचा..

धामारीत मुलाच्या उसन्या पैशावरुन आई वडिलांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे मुलाला दिलेल्या उसन्या पैशाच्या वादातून मुलाच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश चांगदेव पावसे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील अक्षय शेळके याने गावातील गणेश पावसे याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते, त्यांनतर गणेश हा अक्षयच्या घरी […]

अधिक वाचा..

करंदीचे विद्यार्थी पोहचले अहमदाबादच्या इस्रोला

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच अहमदाबाद येथील इस्रो सेंटरला भेट देत विक्रम साराभाई अंतरीक्ष प्रदर्शनीची माहिती घेत येथील विविध प्रकल्पांची पाहणी केली असल्याची माहिती मुख्याध्यापिका राणी ढोकले यांनी दिली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय मुलांना वेगळे काही शिकवण्याचा प्रयत्न केला जात असताना शाळेच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कोयत्याचा धाक दाखवत मागितली खंडणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे येथे एका युवकाला कोयत्याचा धाक दाखवून गावामध्ये सुखरुप राहण्यासाठी खंडणीची मागणी करत लोखंडी गज व काठीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केतन गोरक्ष दरेकर, यश गोरक्ष दरेकर व व्यंकटेश चांदोले या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीराम मंदिर समोरून […]

अधिक वाचा..

सणसवाडीतून गेलेला मोबाईल काही तासात मुळ मालकाच्या स्वाधीन…

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने गाडी नंबर वरुन चालकाचा शोध शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या युवकाचा महागडा मोबाईल एका वाहन चालकाने उचलून नेलेला असताना शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने चक्क काही तासात सदर मोबाईल मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आला आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये राम सूर्यवंशी हा युवक […]

अधिक वाचा..

नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान 

शिरूर: जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील प्रगतिशील शेतकरी नितीन अर्जुन थोरात यांना पुण्यातील अल्पबचत भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात मंगळवारी प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडून आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार दरवर्षी तालुक्यातील एका शेतकऱ्याला दिला जातो. पुरस्काराचे […]

अधिक वाचा..

कोंढापुरीत दुभाजकाला धडकून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून महेश भास्कर हरीचंद्रे असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन महेश हरीचंद्रे हा त्याच्या ताब्यातील एम एच १७ बी टी ३२१३ या दुचाकीहून भरधाव वेगाने […]

अधिक वाचा..