शिरुर विद्याधाम प्रशालेत अवघ्या 32 वर्षांनी भरला दहावी बारावीचा वर्ग…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील विद्याधाम प्रशालेत 1990- 1992 इयत्ता दहावी- बारावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी एका आगळ्या वेगळया अशा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले. 70 ते 89 वयोगटातील गुरुजनांचे बँड व तुतारीच्या गजरात स्वागत केले. गुरुजनांच्या आगमनाने सारे वातावरण भारावून गेले. फुलांच्या पायघड्यांवरुन शिक्षक येताना प्रत्येकाने नमस्कार करुन त्यांचे […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये शासनाच्या वतीने भव्य महासेवा शिबीराचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा (दि. १७) सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर असा राबवण्यात येत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या सर्व विभागाकडील प्रलंबित संदर्भ, अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने संपुर्ण पुणे जिल्हयात एकाच वेळी म्हणजे (दि. २१) सप्टेंबर रोजी महासेवा दिन आयोजित करण्यात येत असुन त्याचाच भाग म्हणून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या भूमी अभिलेखावर कारवाई करा

धामारीच्या नागरिकाची थेट जमाबंदी आयुक्तांकडे लेखी मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील शेतकऱ्याच्या जमिनीची चुकीच्या पद्धतीने मोजणी करत भू माफियांच्या मदतीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिरुर तालुक्यातील भूमी अभिलेख अधिकारी विनायक ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तेजस मोहिते यांनी जमाबंदी आयुक्तांकडे केली आहे. धामारी (ता. शिरुर) येथे मोहिते कुटुंबियांची जमीन असून सदर जमिनीच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मागासवर्गीय समाजाचे कचरा बंद आंदोलन…

कचरा संकलित करणाऱ्या गाड्या आणण्यास ग्रामस्थांचा विरोध शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काही केल्या संपत नसताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांना तारीख पे तारीख मिळत असताना आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावातून कचरा संकलित करुन येणाऱ्या गाड्याच ग्रामस्थांनी रोखत कचरा बंद आंदोलन सुरु केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अनेक दिवसांपासून कचरा प्रश्न […]

अधिक वाचा..

बैलपोळ्यावर लंपी रोगाचं सावट सणासाठी बैल एकत्र आणण्यास बंदी

शिरुर (अरुणकुमार मोटे) लंम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैल पोळा सणानिमित्त गावातील बैल एकत्र आणण्यास सरकारने बंदी केली असून आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांनी दोन वर्ष बैलपोळा सण साजरा केला नव्हता. त्यात यावर्षी लंम्पी चर्मरोगामुळे हा सण साजरा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महाराष्ट्र राज्यात लंपी चर्मरोग हा विषाणूजन्य सांसर्गिक रोग प्रादुर्भाव केवळ गोवंशीय पशुधनात आढळून आलेला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विषारी सर्पदंशाने शेतकऱ्याच्या गाईचा काही क्षणात तरफडून मृत्यू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील वागदरे वस्ती नजीक घोणस या जातीच्या सापाने हरीभाऊ वागदरे यांच्या दुभत्या जर्शी गायीच्या तोंडास चावल्याने काही मिनीटातच त्या गाईचा सापाच्या विष बाधेने तरफडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वागदरे वस्तीत राहणारे गिताराम हरिभाऊ वागदरे यांचा नातू ओंकार हा नेहमी प्रमाणे जनावरे, शेळ्या घेऊन जवळील उसाच्या शेतीनजीकच्या मोकळ्या रानात […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथील अभिनव विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

शिरुर (तेजस फडके) सरदवाडी (ता.शिरुर) येथील अभिनव विद्यालय या माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एन एम एम एस) पात्र विद्यार्थ्यांची परंपरा कायम ठेवत चालु २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करत हा यशाचा आलेख उंचावत ठेवल्याबद्दल शिरुर तालुक्याचे माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत (काका) पलांडे यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक […]

अधिक वाचा..

कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगून काम करावे; नितीन महाजन

विद्युत वितरण तर्फे विद्युत कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा शिबिराचे आयोजन शिक्रापूर (शेरखान शेख): विद्युत कर्मचारी हे नागरिकांना सेवा देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात मात्र विद्युत कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगून काम करावे, असे आवाहन विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी केले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथे शिरुर तालुक्यातील विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचा विजेचा प्रश्न सोडवत आश्वासनाची पूर्तता

शिक्रापूर ग्रामस्थांच्या आंदोलनाला विद्युत वितरणकडून यश शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य गावामध्ये अनेक दिवसांपासून विजेच्या समस्या असल्याने ग्रामस्थांनी मागील आठवड्यात विद्युत वितरण कार्यालयवर मोर्चा काढला असता अधिकाऱ्यांनी 8 दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असता नुकतेच विद्युत वितरणकडून शिक्रापूर गावासाठी नवीन अतिरिक्त विद्युत रोहित्र देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून विद्युत […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीणच्या दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती नुसार बदली करण्यात आलेल्या असून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस दलातील 10 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बदली बाबतचे अर्ज पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिलेले असता नुकत्याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या जाहीर […]

अधिक वाचा..