नितीन सुद्रीक यांची पोलिस हवालदारपदी बढती

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक नितिन पोपट सुद्रिक यांची नुकतीच पोलीस नाईक पदावरुन पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे.

पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक जणांची पोलिस नाईक ते पोलिस हवालदार, पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झालेली असताना शिरुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले नितीन सुद्रीक यांची देखील बढती झाली असून त्यांनी यापूर्वी शिरुर, लोणी काळभोर येथे काम केले आहे.

सध्या ते पुन्हा शिरुर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असून प्रभारी पोलिस निरीक्षक यांचे ते दत्परी आहे. अनेक वेगवेगळ्या गंभीर गुन्हे ऊघडकीस आणुन गुन्ह्यांचा य़ोग्य तपास करुन आरोपीतांना शिक्षा होण्याकामी कागदपत्रांची पुर्तता करण्याचे काम ते करत आहे. त्यांची नुकतीच सेवा कार्यकालानुसार पोलीस नाईक या पदातून पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे.

नितीन सुद्रीक यांच्या बढती बद्दल त्यांचे पुणे जिल्ह्यातून स्वागत होत आहे, तर शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवालदार परशराम सांगळे, अनिल आगलावे, सहाय्यक फौजदार गणेश देशमाने, पोलीस नाईक अनिल हाळनोर, राजेंद्र वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद काळे, विशाल पालवे, पवन तायडे आदी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या हस्ते नितीन सुद्रीक यांना सन्मानित करण्यात आले आहे.