निओसीम इंडस्ट्रीज मध्ये वेतन वाढ करार संपन्न

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक क्षेत्रातील निओसीम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात पाचवा वेतन वाढ करार शांततामय वातावरणात संपन्न झाला असून यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी १३ हजार ५०० रुपयाने वाढ करण्यात आली. या करारामुळे सध्या कामगारांचे वेतन हे ५० हजार रुपये इतके झाले आहे. कामगार हित जोपासत […]

अधिक वाचा..
pimperkhed rain

विडिओ: पिंपरखेड मध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस….

सविंदणे (अरुणकुमार मोटे): दिवसभर उन्हाचा मोठा तडाखा, प्रचंड उकाड्यामुळे पिंपरखेड व परिसर त्रस्त होता… संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. व परिसर जलमय झाला. ग्रामस्थ ही निवांत झाले… परंतु रात्री साडेतीन च्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र हा पाऊस वेगळेच चिन्ह दाखवत होता…. थांबतही नव्हता उलट जोर वाढत गेला….. सकाळी साडेपाच च्या सुमारास पावसाने उसंत […]

अधिक वाचा..
Midgulwadi home

मैत्रीचे नाते! जीवाला जीव देणारे मित्र भेटायला सुद्धा नाशिब लागतं…

शिरूरः मैत्री असावी तर कृष्ण-सुदाम्यासारखी, कर्ण-दुर्योधनासारखी. एखाद्या झऱ्याच्या वाहणाऱ्या निखळ पाण्यासारखी पारदर्शी. प्रत्येक सुख दुःखात, संकटांमध्ये साथ देणारेच खरे मित्र असतात. कठीण प्रसंगांमध्ये एखाद्या योद्याप्रमाणे मागे उभे राहतात. मित्र हे हिऱ्याप्रमाणे असतात. शिरूर तालुक्यातही जिवाला जिव देणारे अनेक मित्र आहेत. आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात, मानली जातात. […]

अधिक वाचा..
Vijay Thorat

मानव विकास परीषदेच्या युवक उपाध्यक्षपदी विजय थोरात यांची निवड

शिरूर (किरण पिंगळे): वाघाळे (ता. शिरूर) येथील विजय अशोक थोरात यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुका युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असून, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाज्यातील भांडवलशाहीकडून पैशाच्या व […]

अधिक वाचा..

चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक

शिक्रापूर: शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप (ता. शिरुर) चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक झालेला असल्याने वाहन चालकांना वाहनाचा अंदाज येत नसल्याने वाहने दुभाजकावर जात असून अनेक अपघात होऊ लागल्याने येथील धोकादायक दुभाजक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे. शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप चौफुला रस्त्यावर चौफुला येथे रस्ता दुभाजक बनविण्यात आलेला आहे. मात्र येथील दुभाजक […]

अधिक वाचा..
balrangbhumi parishad

शिरूर तालुक्यातून बाल रंगभूमी परीषदेस मोठा प्रतिसाद; पाहा विद्यार्थ्यांची नावे…

शिरूर : बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा परीषदेसाठी मोठा प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती बालरंगभूमी परीषदेच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा दीपाली शेळके यांनी दिली. ‘बालरंगभुमी परिषद पुणे जिल्हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात १ ली ते १० वीच्या […]

अधिक वाचा..

कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही: रमेश गडदे

माझ्यामागे ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा गडदेंचा दावा शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असून त्याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले असताना माझ्या मागे संपूर्ण ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा दावा करत कोणत्याही दबावाला बळी पडणार असल्याचे सरपंच रमेश […]

अधिक वाचा..

सुभाष विद्यामंदिरच्या सवंगड्यांची ३६ वर्षानंतर भरली शाळा

कासारीतील हिराबाई गायकवाड विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात तळेगाव ढमढेरे येथील सुभाष विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला असल्याने शालेय सवंगड्यांची तब्बल ३६ वर्षांनंतर शाळा भरल्याचे दिसून आले. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे तळेगाव ढमढेरे गावातील जुन्या सुभाष विद्यामंदिर या शाळेमध्ये १९८४ […]

अधिक वाचा..

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतुक कोंडी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज, एम टेक, पॉली प्लास्टिक, नॅनको एक्झिम, अथर्व पॉलिमर, थ्री ए,जामील स्टील या कंपन्या असुन या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल वाहतुक करणारी वाहने टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी […]

अधिक वाचा..

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या वृत्तानंतर शाळा व पोलीस प्रशासन जागे

महाविद्यालयीन भाईगिरी करणाऱ्यांना चांगलीच अद्दल, शरीरावर ग्रुपचे लोगो काढण्यासह नियमांचे पालन करण्याचे आदेश शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गुंडगिरी, भाईगिरीचे आकर्षण वाढू लागलेले असून युवकांकडून शरीरावर ग्रुपची नावे टाकून विविध पद्धतीने भाईगिरी केली जात असल्याबाबतचे वृत्त नुकतेच “शिरुर तालुका डॉट कॉमने” प्रसिद्ध केले असताना शाळा व पोलीस प्रशासनाने पालकांसह ग्रामस्थांची […]

अधिक वाचा..