सणसवाडीच्या नोवेल प्राईड स्कूलने अनुभवला पालखी सोहळा

विठ्ठल रुख्मिणीच्या वेशात भगवी पताका घेत विद्यार्थी पालखी सहभागी शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील नोवेल प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथील विद्यार्थ्यांनी भगव्या पताका सह पालखी खांद्यावर घेत, टाळ मृदुंग वाजवत, फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केल्याने नोवेल प्राईडच्या मुलांचा पालखी सोहळा चांगलाच रंगल्याचे दिसून आले. सणसवाडी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

केंदूरच्या पाचवड शाळेत मार्गदर्शक शिक्षक व गुणवंतांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंथन व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करत सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी कोरोना काळात देखील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण मुलांना देत मुलांची शिष्यवृत्ती पूर्व […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल मालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

शिरुर तालुक्यातील करडे घाटातील हॉटेल मधील घटना शिक्रापूर (शेरखान शेख): करडे घाट (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये युवकांनी केलेल्या जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणातून एका महिलेसह ७ जणांच्या टोळक्याने हॉटेल मालकासह कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे वागताराम चौधरी, आकाश गायकवाड, संतोष गायकवाड, प्रशांत युवराज गायकवाड, शिवाजी श्रीराम, आकाश भोरडे, […]

अधिक वाचा..
Nathabhau Shewale

नाथाभाऊ शेवाळे महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरच्या ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील नाथाभाऊ हरिभाऊ शेवाळे यांची जनता दल सेक्युलरच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेशाध्यक्ष” पदी नुकतीच निवड करण्यात आली. जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या हस्ते त्यांना बंगलोर येथील निवास्थानी निवडीचे पत्र दिले. नाथाभाऊ शेवाळे हे गेले ३० वर्ष जनता दलाचे निष्ठावान कार्यकर्ते असुन देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त उघड्यावर कचऱ्याची वाहतुक: ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन हा दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत आहे. कारेगाव येथील यश इन चौक तसेच रांजणगाव येथील राजमुद्रा चौक या मुख्य दोन चौकातुनच हा कचरा MIDC त आणुन त्याची विल्हेवाट लावली जात […]

अधिक वाचा..

बिबट्याचा बंदोबस्त करा: शेखर पाचूंदकर यांची मागणी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात ऊस तोडणी झाल्यामुळे बिबट्याला आश्रयासाठी जागा उरली नसल्याने बिबट्याने त्याचा मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, वासरांवर सातत्याने बिबट्या हल्ला करत आहे. आता त्याचा वावर लोकवस्तीकडे वाढल्याने माणसांवर देखील हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी […]

अधिक वाचा..

करंदीत कृषीदुतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी या विद्यालयातील कृषीदुतांनी कृषी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज उत्पादन क्षमता यांचे प्रात्यक्षिके दाखवत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. करंदी (ता. शिरुर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय […]

अधिक वाचा..
dead

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील पंडित सातपुते हा व्यक्ती घरात असताना घराचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे त्याची पत्नी कल्पना सातपुते हिने घरात पाहिले असता पंडित वेगळीच हालचाल व धडपड करताना दिसून आला. त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीना याबाबत आवाज देऊन सांगितले. यावेळी येथील लोकांनी खिडकीतून पाहिले असता पंडित कोंडीबा सातपुते (वय ३५) रा. कासारी […]

अधिक वाचा..

करडे येथील एस टी बस स्थानक कॅन्टीनच्या बाजूला अतिक्रमण

आगार व्यवस्थापकांची तहसीलदार आणि पोलिसांकडे लेखी तक्रार शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकामधील कॅन्टीनच्या बाजूने स्थानिक रहिवाशांकडून अतिक्रमण केल्याबाबत शिरुर आगार व्यवस्थापक यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन शिरुर आगाराचे व्यवस्थापक यांनी पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पर्यवेक्षकांनी बस स्थानकाची […]

अधिक वाचा..
Mathadi

रांजणगाव MIDC त ‘माथाडी’ च्या नावाखाली जबरदस्तीने ‘पैसे वसुली’

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत बाहेरुन कंपनीचे साहीत्य घेऊन येणाऱ्या वाहनांच्या चालकांकडून माथाडीच्या नावाने “बोगस पावत्या” फाडुन जबरदस्तीने पैसे वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन याबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास कंपनीत येणाऱ्या गाड्या बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचे काही चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच औद्योगिक वसाहतीत […]

अधिक वाचा..