रांजणगाव MIDC त उघड्यावर कचऱ्याची वाहतुक: ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन हा दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत आहे. कारेगाव येथील यश इन चौक तसेच रांजणगाव येथील राजमुद्रा चौक या मुख्य दोन चौकातुनच हा कचरा MIDC त आणुन त्याची विल्हेवाट लावली जात असताना ट्राफिक पोलीस नक्की काय करतात असा प्रश्न विचारला जात आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कचरा असतो. त्यामध्ये काही जैविक तर काही घनकचरा असतो. हा कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्याच कंत्राट काही स्थानिक लोकांनी घेतलं असुन ठराविक कंपनीचा कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावायची संपुर्ण जबाबदारी त्या संबंधित ठेकेदारांची असते.परंतु हे ठेकेदार हा गोळा केलेला कचरा MIDC च्या मोकळ्या जागेत टाकत आहेत. तसेच हा कचरा वाहताना त्याच जैविक आणि घन अस वर्गीकरण न करता सगळा कचरा एकत्र करुन त्याची वाहतुक केली जाते.

unique international school
unique international school

तसेच टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा भरल्याने तसेच जैविक आणि घन कचरा एकत्र केल्याने त्या वाहनातून तो कचरा अक्षरशः रस्त्यावर सांडत जातो. त्यामुळे त्या वाहनाच्या आजूबाजूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर कचरा उडाल्याने त्यांचे कपडे खराब होतात. या कचऱ्यात अनेक वेळा कॅन्टीनचे खाद्य पदार्थ सुद्धा असतात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वास येतो. परंतु वाहनचालकाला त्याची फिकीर नसते. विशेष म्हणजे MIDC च्या वर्दळीच्या रस्त्यावरुन हि वाहने जातात. परंतु ट्राफिक पोलिसांच त्यांच्याकडे लक्ष जात नाही हि विशेष बाब आहे.

ट्राफिक पोलीस नक्की करतात काय…?
रांजणगाव MIDC त अनेक कंपनीच्या गेटच्या बाहेर अवजड वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केलेली असतात. अनेकवेळा MIDC तुन बेकायदेशीर मुरुम वाहतुक करणारी अवजड वाहने सर्रास फिरत असतात. तसेच अनेक मुरुम तसेच खडी वाहतुक करणाऱ्या गाड्यांना नंबरप्लेट नसतात यावर पोलीस कारवाई का करत नाहीत…? कारेगाव येथील यश इन चौकात बऱ्याचवेळा टवाळखोर तरुण वेगात वाकडी तिकडी वाहने चालवतात यावर ट्राफिक पोलीस कारवाई केव्हा करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.